Movie: Raakshas
Director: Dnyanesh Zoting
Cast: Sai Tamhankar, Sharad Kelkar, Rujuta Deshpande, Dayashankar Pandey, Vijay Maurya, Yakub Sayeed, Purnanand Wandhekar, Umesh Jagtap, Vitthal Kale

Movie: Raakshas
Director: Dnyanesh Zoting
Cast: Sai Tamhankar, Sharad Kelkar, Rujuta Deshpande, Dayashankar Pandey, Vijay Maurya, Yakub Sayeed, Purnanand Wandhekar, Umesh Jagtap, Vitthal Kale
‘Raakshas’ : na
‘राक्षस’ या चित्रपटात दिसणार शरद केळकर आणि सई ताम्हणकर
na
निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस‘ असे हटके नाव असलेला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत एक जबरदस्त ‘बाहुबली’ आवाज असलेला अभिनेता आपल्या भेटीला येणार आहे, ज्याने संग्राम ही खलनायकाची ‘लय भारी’ भूमिका साकारत तमाम मराठी रसिकांची मने जिंकली होती तो अभिनेता म्हणजे शरद केळकर. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी नवीन, फ्रेश जोडी प्रेक्षकांना ‘राक्षस‘ ‘या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केळकर अविनाश ही व्यक्तीरेखा यामध्ये साकारत असून तो एक डॉक्यूमेंट्री मेकर आहे, त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ‘राक्षस’ मध्ये पाहायला मिळणार आहे.
‘राक्षस‘ असा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारेआल्याशिवाय रहात नाहीत. राक्षसाची विविध रूपेआजपर्यंत आपण गोष्टींमध्ये ऐकलेलीआहेत. आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचं ‘राक्षस‘च लेखन अनुभवसिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत.
शरद केळकरचा वेगळा लुक असलेल्या या नव्या पोस्टरमुळे ती अजून ताणली गेली आहे. या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय गुढ दडले आहे याची उकल येत्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे.