‘झी युवा’वाहिनी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे, एक नवाकोरा, जबरदस्त टैलेंट ने भरलेला कार्यक्रम, ‘लाव रे तो विडिओ’ . या नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके संयोजक डॉ. निलेश साबळे. महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. घरबसल्या, अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करण्याची संधी, ‘झी युवा’मुळे महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना मिळणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या अप्रतिम कार्यक्रमाचे सूत्रधार, डॉक्टर निलेश साबळे, आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा, कल्ला करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करू शकेल, सगळ्यांना पोट धरून हसायला लावेल, असं टॅलेंटचा सध्या शोध सुरु आहे . पण या कार्यक्रमाच आणखी एक खास सरप्राईज सुद्धा आहे . डॉ . नीलेश साबळेंबरोबर आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होणार आहे. आणि तुमचे टैलेंट वर त्यांची आवड निवड सांगणार आहेत . लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ, कंटाळा, वैताग या सगळ्या गोष्टींवर मात करून खळखळून हसण्यासाठी, आता आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. ‘लाव रे तो विडिओ’ या कार्यक्रमातून, महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाईल किंवा इंटरनेट वर अड्कले होते आता लाखो करोडो लोकानां टीव्हीवर पहायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचे हमखास मनोरंजन होईल. एक आगळीवेगळी संकल्पना, प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग यामुळे, या कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.
Read More