प्रख्यात नाट्यकर्मी डॉ विजया मेहता ह्यांची एक आधुनिक कार्यशाळा
जेष्ठ नाट्यकर्मी डॉ. विजया मेहता, ‘मॅजीक मोमेंटस – सर्च बाय अ परफॉर्मर अॅन एनकाऊन्टर वुईथ डॉ विजया मेहता‘ या नावाच्या पाच दिवसांच्या आधुनिक कार्यशाळेचे आयोजन करत असून त्याद्वारे त्या करियरच्या मध्यावर असलेले अभिनेते, दिग्दर्शक यांना विशेष प्रशिक्षण देणार असून रंगभूमीच्या निरीक्षकांसाठी एक अंतर्ज्ञान अनुभूती देणार आहेत.
ह्या कार्यशाळेमध्ये डॉ. विजया मेहता या आजच्या रंगभूमी कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या धारणा आणि दृष्टीकोन यांच्याबद्दल बोलणार आहेत. प्रत्येक सत्रामध्ये पंचवीस अभिनेते आणि पाच दिग्दर्शक तसेच कला जगतातील विविध क्षेत्रात निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या वैविध्यपूर्ण अशा व्यक्तीमत्वांच्या सानिध्यात संवाद साधला जाणार आहे. त्याचबरोबर प्रश्न आणि उत्तरांचे एक सत्र असणार आहेत.
पुढील महिन्यात २ ते ६ मे २०१६ दरम्यान ही कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे.