News

‘तू माझा सांगाती’ मालिकेमधील चिन्मय मांडलेकर वारकऱ्यांच्या भेटीला

Marathi serial 'Tu Majha Saangati'

Chinmay Mandlekar , Marathi serial ‘Tu Majha Saangati

संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ संत तुकाराम. तुकारामांच्या अंभगवाणीने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगती या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. याच मालिकेमध्ये संत तुकारामांची व्यक्तिरेखा साकारणार महाराष्ट्राचा लाडका अभिनेता चिन्मय मांडलेकर वारकऱ्यांना भेटायला वारकऱ्यांच्या रुपात जाणार आहे. तसेच ‘तू माझा सांगाती‘ मालिकेचे १००० भागांचा पल्ला गाठला असून प्रेक्षकांना आता लवकरच तुकारामांच्या मुखी विठ्ठल रखुमाईची संसारगाथा बघायला मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका ‘तू माझा सांगाती – पर्व दुसरे‘ लवकरच कलर्स मराठीवर.

विठुरायाचे भक्त पंधरा ते वीस दिवस पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनास येतात. संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्यारतुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. याचनिमित्ताने चिन्मय मांडलेकर या वारकऱ्यांना भेटायला जाणार असून या वारीमध्ये चिन्मय अभंग देखील म्हणार आहे ज्यामुळे वारीचे वातावरण अधिकच भक्तीमय होणार आहे. तसेच वारीमध्ये येणाऱ्या दिंडीमधून सर्वात उत्तम दिंडीला कलर्स मराठी तर्फे चिन्मय मांडलेकरच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येणार आहे.

तेंव्हा तुम्ही सुध्दा पंढरपुरच्या वारीचा हा अनोखा भक्तिमय सोहळा चुकवु नका चिन्मय मांडलेकर सोबत कलर्स मराठी आयोजित ‘रंग सावळ्या विठुरायाचा गंध मराठी संस्कृतीचा‘  ४ जुलै रोजी संध्या. ६.०० वा. जुना सोलापूर नाका इथे.

Most Popular

To Top
  • News Alert Subscription
  •