तावडे साहेब, महाराष्ट्राच्या रत्नागिरीत मराठी ऐवजी तेलुगु चित्रपटाला प्राधान्य

Yevadu

महाराष्ट्राचे माननीय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच मल्टीप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट प्रायीम टायिम ला दाखविण्याची घोषणा करून मराठी चित्रपट निर्मात्यांना आणि मराठी चित्रपट रसिकांना खुश केले. त्यानुसार मुंबई, पुणे येथे प्रायीम टायिम ला मराठी चित्रपट चांगली गर्दी खेचत आहेत. पण सिंगल स्क्रीन सिनेमा मात्र या बाबत मराठी चित्रपटांना प्राधान्य देत नाही असे आढळून येत आहे. महाराष्ट्रात अश्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहात जर प्रायीम टायिम ला मराठी चित्रपट दाखविले तर, तर मराठी चित्रपटांना नक्कीच घवघवीत यश मिळेल.

आता रत्नागीरीचेच उदाहरण घ्या. रत्नागिरी शहरात मराठी लोकसंख्या भरपूर असूनही, श्रीराम सारख्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहात २७ मार्च पासून, ‘येवाडू‘ हा तेलगु चित्रपट रोज ३ शो मध्ये दाखविला गेला. ३ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान फास आयंड फ़ुरिउस या इंग्रजी चित्रपटाचे ३ शोज , त्यापाठोपाठ आता आता १० तारखेपासून हिंदी पडेल चित्रपट ‘ एक पहेली लीला‘ चे ३ शोज दाखविण्यात येत आहेत. पण मराठी चित्रपटांचा पत्ता येथे कट केला आहे, असे म्हणयचे का ?

गेल्या आठवड्या आलेल्या ‘कोफी आणि बराच काही’ आणि कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘काकण’ या चित्रपटाला येथे शो मिळू शकत नाही, याचे आश्चर्य वाटते. कोकणातील इतर सिनेमा गृहात सुद्धा मराठी चित्रपट एखादाच शो मिळवतात. बाकी हिंदी किंवा तेलुगु चित्रपटासाठी दिवसात तीन शो! रत्नागिरीत मराठीचा टक्का घसरला, की वितरकान्तर्फे दुसरे काही राजकारण चालले आहे ? सांस्कृतिक मंत्र्यांनी याकडेही कृपया लक्ष द्यावे.