‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमध्ये श्रीकांत खेळणार नवी खेळी

Laxmi Sadaiva Mangalam Serial Still
Samruddhi Kelkar in serial ‘Laxmi Sadaiva Mangalam’

लक्ष्मी सदैव मंगलम्‘ मालिकेमध्ये काही दिवसांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. लक्ष्मी मल्हारच्याच घरी रहात असून तिने ते घर सोडण्यास नकार दिला आहे. परंतु त्यामागचे कारण अजूनही मल्हारला माहिती नाहीये. आर्वीसमोर अजूनही लक्ष्मी आणि मल्हारच्या लग्नाचे सत्य आलेले नाही. लक्ष्मीच्या जाण्याने श्रीकांत खूपच अस्वस्थ झाला आहे. त्यांचा सगळा पैसा, वैभव हळूहळू निघू जात आहे याची कल्पना त्याला आली आहे. लक्ष्मी श्रीकांत म्हणजेच त्यांच्या घरासाठी आणि गावासाठी शुभ होती आणि ती गेल्यापासूनच ही सगळी संकंट येत आहेत याची जाणीव झाल्याने श्रीकांत लक्ष्मीला शोधण्यासाठी बाहेर पडला आहे. हा जुना गडी म्हणजेच श्रीकांत लक्ष्मीला भेटल्यावर कोणती नवी खेळी खेळणार हे बघणे रंजक असणार आहे.

लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेत लक्ष्मीचं मल्हारवरचं प्रेम नि:स्वार्थी असून त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये म्हणून लक्ष्मी घर सोडून जाण्यास नकार देत आहे. आर्वीने देखील लक्ष्मीने मागितलेले वचन तिला दिले असून आता लक्ष्मी मल्हारचे घर सोडून जाणार नाही हे तर नक्की आहे . हे सगळे होत असतानाच मल्हारच्या भावाचे लक्ष्मीवर एक तर्फी प्रेम असून तो त्याच्या प्रेमाची कबुली लवकरच देणार आहे. यावर मल्हारचे काय मत असेल ? लक्ष्मी यावर काय बोलणार ? हे जाणून घ्या ‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ मालिकेत.