‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस
कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये सध्या अभिमन्यू आणि लतिकाचे मालिकेध्ये वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात. ‘आपल्यात कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार‘ असे लतिकाने अभिला सांगितले आहे. अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला मिळणार आहे अभिची साथ.
प्रेक्षकांच्या मिळणार्या उदंड प्रतिसादामुळे मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले… मालिकेतील पात्र, अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अभीची आई म्हणजेच अतिशा नाईक, अभिची वाहिनी तसेच कामिनी, सज्जनराव यांची भूमिका देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सध्या मालिकेमध्ये शर्यतीचा मुद्दा सुरू आहे ज्यात दौलतने अभिमन्यूला भाग घेण्याचे आव्हान दिले आहे. पण, अभीचे वडील याच्या पुर्णपणे विरोधात आहेत. अभिमन्यू लतिकाच्या साथीने कसा वडिलांचा होकार मिळवणार ? आणि तो शर्यतीत भाग घेणार का ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.