‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेने गाठला १०० भांगाचा पल्ला

कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन मालिका सुरू होण्याआधी बरीच चर्चेत होती. मालिकेचा विषय खूपच वेगळा, सुयश – सायलीची जोडी देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस होणार होती, सुकन्या कुलकर्णी मोने या देखील कलर्स मराठीवर परतणार होत्या.

सुबोध आणि मंजिरी भावे यांची निर्माते म्हणून पहिलीच मालिका आणि बर्याच गोष्टी. सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे ! आतापर्यंत एका व्हिडिओ कॉलवर सार्या भेटीगाठी पार पडत, मन जुळत, मैत्री होत असे. पण, आता मात्र ऑनलाईन लग्नाच्या गाठी देखील जुळल्या.

शंतनू - शर्वरीच्या विवाहसोहळा तर पडला पण त्यांच्या आयुष्यात अचानक ऐश्वर्याच्या येण्याने बरीच उलथापालथ होते आहे. आता शर्वरीच्या साथीने शंतनूला कुटुंबाची साथ कशी मिळेल ? शर्वरी त्याला साथ देईल ? ऐश्वर्याचा नक्की हेतु काय आहे ? तिचा खेळ शर्वरी – शंतनू उधळून लावू शकतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे..

नुकताच मालिकेने १०० भागांचा पल्ला गाठला. प्रेक्षकांच्या मिळणार्या उदंड प्रतिसादामुळे हे शक्य होऊ शकले. मालिकेतील पात्र, विषय, जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन याचे सेलिब्रेशन केले. सुकन्या कुलकर्णी मोने, सायली संजीव, सुयश टिळक, सुबोध भावे, मंजिरी भावे यांच्या आणि संपूर्ण टिमच्या उपस्थितीत केक कट करून, सेल्फी काढत या सगळ्यांनी आनंद व्यक्त केला.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची भारतीय पारंपरिक योगाला पसंती

सद्या लोकं निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात, पण अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हि स्वतःची तब्येत उत्तम ठेवण्यासाठी भारतीय पारंपरिक योगा करणे जास्त पसंत करते. काही दिवसांपूर्वी दापोली मध्ये निसर्गाच्या सानिध्यात योगा करताना ती दिसली, त्यावेळीची काही छायाचित्रे.

काही वर्षांपूर्वी तेजस्विनीचा ‘बर्नी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यातील तिच्या अभिनायचे सर्वांनीच कौतुक केले. आता आगामी चित्रपट, ती नक्की कुठल्या वेगळ्या भूमिकेत दिसणार ह्याची चाहत्यां उत्सुकता आहे

शंतनु मोघे आणि प्रिया मराठे-मोघे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
सध्याच्या बिकट परिस्तितीवर मात करण्यासाठी , ‘जनकल्याण रक्तपेढी’ तर्फे रक्तदान शिबीर आयोजित कार्यांत आले होते. त्या वेळी सामाजिक बांधिलकी जपत अभिनेता शंतनु मोघे आणि प्रिया मराठे-मोघे ह्यांनी त्यात भाग घेतला. दोघांचे मनःपूर्वक आभार, धन्यवाद!

Shantanu Moghe, Priya Marathe at Blood donation camp in their society.

Shubhavi Gupte

Bogda Movie Stills

Amruta Khanvilkar, Actress
Gotya Movie Stills

Sumedh Mudgalkar, Actor
Photos/Pictures of Marathi Actor Sumedh Mudgalkar.