‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये भरत जाधव विठ्ठलाच्या भूमिकेत
‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना तुकारामांची विठूरायावर असलेली निस्सीम भक्ती बघायला मिळाली. आता मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे पहील्यांदाच महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव विठ्ठ्लाच्या भूमिकेत तर स्मिता शेवाळे रखुमाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
विठ्ठल म्हणजे कृष्णाचं रूप, पण यामागे देखील आख्यायिका आहे. असे म्हणतात कि, रुक्मिणी काही कारणास्तव कृष्णावर रुसली आणि द्वारिका सोडून पृथ्वीतलावर आली. आपल्या रुसलेल्या पत्नीच्या शोधात कृष्ण विठू रायाच रूप घेऊन पृथ्वीवर आला. पण, नव्या रुपात समोर उभ्या ठाकलेल्या कृष्णाला रुक्मिणी ओळखूच शकली नाही. आपल्या चतुर बोलण्याने विठ्ठ्लाने रुक्मिणीचे मन जिंकले आणि तिचा सखा बनला.
‘तू माझा सांगाती’ पर्व दुसरे या मालिकेविषयी बोलताना कलर्स मराठी प्रमुख Viacom18 निखील साने म्हणाले, “रंगमंच्याचा हुकमी एक्का ठरलेला, तसेच निव्वळ विनोदच नव्हे तर आशयपूर्ण भूमिकादेखील तितक्याच ताकदीने साकारलेला कलाकार म्हणजे भरत जाधव. कुठलीही भूमिका सहज, सुंदरपणे साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणे हा भरतचा हातखंड आहे“.
या मालिके विषयी बोलताना भरत जाधव म्हणाले, “मी खूप खुश आहे कि, मला ही भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी मिळाली. कलर्स मराठीकडून जशी ही भूमिका माझ्याकडे आली मी लगेच माझा होकार कळवला. याच महत्वाचं कारण असं कि, आमच्या घरी गेल्या बऱ्याच वर्षांपासून गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो“. तेंव्हा बघायला विसरू नका ‘तू माझा सांगाती’ पर्व दुसरे – विठ्ठल रखुमाईची संसारगाथा ६ सप्टेंबर पासून सोम ते शनि संध्या ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.