गश्मीर महाजनीच्या डान्स स्टुडियोच्या वार्षिक समारंभाला रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अभिनेता गश्मीर महाजनीच्या ‘जीआरएम डान्स स्टुडियो’च्या डान्स स्टुडियो सुरू केला. यंदा त्याच्या डान्स स्टुडियोला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. शुक्रवारी ह्या डान्स स्टुडियोचा वार्षिक समारंभ झाला. ज्याला स्टुडियोच्या विद्यार्थ्यांसह पूणेकरांचा चांगलाचा प्रतिसाद लाभला.
यशवंतराव नाट्यगृहात आयोजित होणारा हा वार्षिक समारंभ भव्य आणि लॅविश करण्यावर त्याचा भर दिसून येत होता. कथ्थक पासून ते बॉलीवूड डान्स नंबर आणि हिपहॉपपर्यंत सर्व डान्स प्रकार ह्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. ह्या समारंभात ‘टॉलीवूड डान्स एक्ट’ आणि गश्मिरचा डान्स परफॉर्मन्स हे मुख्य आकर्षण ठरले.
वार्षिक समारंभाच्या सुरूवातीला जीआरएम डान्स स्टुडियोने सीमेवर लढणा-या जवानांना, अमरनाथ यात्रेत बळी पडलेल्या यात्रेकरूंना आणि शहिदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला स्पृहा जोशी, समीर विव्दंस, सीमा देशमुख, सतीश आळेकर, असे मराठी फिल्मइंडस्ट्रीतले अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री गिरीजा ओकने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि गश्मिर सोबत छोटासा परफॉर्मन्सही केला.