‘कल्पना एक आविष्कार अनेक’ मध्ये ‘मैं वारी जावां…’ सर्वोत्कृष्ट एकांकिका

Kalpana Ek Aavishkar Anek

लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या ‘अस्तित्व’ आयोजित कै.  श्री. मु. ब. यंदे पुरस्कार ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ २०१५ या एकांकिका स्पर्धेत दिशा थिएटर्स ठाणेची ‘मैं वारी जावां…’  सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली तर फिनिक्स, मुंबईची ‘मन्वंतर’ ही एकांकिका द्वितीय पारितोषिक विजेती ठरली.

यंदा ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांनी नात्यांबाबत गहिरा आशय व्यक्त करणारी  ‘अलाव’ही कविता विषय होती.  अंतिम फेरीचे परीक्षण प्रतिमा कुलकर्णी,जयंत पवार,वैभव जोशी,विद्याधर पाठारे आणि हृषीकेश जोशी या मान्यवर परीक्षकांनी केले.

या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे  पारितोषिक स्वप्निल चव्हाण याला  ‘मन्वंतर’ या एकांकिकेसाठी देण्यात आले. प्रेक्षक आणि परीक्षक या दोघांच्याही पसंतीस पात्र ठरलेला ‘मैं वारी जावां’तला  प्रसाद दाणी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.  ‘ऋणानुंबंध’च्या भाग्यश्री पाणेला अभिनयाचे द्वितीय, ‘मन्वंतर’ साठी अजित सावंतला तृतीय, ‘टर्मिनल’साठी प्रज्ञा शास्त्री यांना चतुर्थ तर ‘ऋणानुंबंध’ च्या मैथिलि तांबे ला पंचम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

अंतिम फेरी – निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम): दिशा थिएटर्स – ‘मैं वारी जावां…’
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय): फिनिक्स, मुंबई – ‘मन्वंतर’
सर्वोत्कृष्ट लेखक : स्वप्निल चव्हाण – ‘मन्वंतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय (प्रथम) : प्रसाद दाणी – ‘मैं वारी जावां’
सर्वोत्कृष्ट अभिनय (द्वितीय) : भाग्यश्री पाणे – ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट अभिनय (तृतीय) : अजित सावंत – ‘मन्वंतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय (चतुर्थ) : प्रज्ञा शास्त्री – ‘टर्मिनल’
सर्वोत्कृष्ट अभिनय (पंचम) : मैथिलि तांबे – ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकर : शीतल तळपदे – ‘टर्मिनल’
सर्वोत्कृष्ट नेपथय :संदेश जाधव – ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट संगीत : मल्हार फडके, संतोष वाडेकर – ‘मन्वंतर’

परीक्षक : प्रतिमा कुलकर्णी,जयंत पवार,वैभव जोशी,विद्याधर पाठारे आणि हृषीकेश जोशी