कविता राम यांची फ्युजन सॉंगमधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली.

Kavita Ram Image

गायिका कविता राम यांनी फ्युजन सॉंगच्या माध्यमातून नवा प्रयोग केलाय. कविता यांनी ह्या आधी अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी गायलेली सुमधुर गीते आजही प्रेक्षक गुणगुणतात. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत. जुन्या गाण्यांना नव्या रूपात म्हणजेच फ्युजनच्या रूपात सादर करून कविता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली दिली आहे. कविता यांनी केलेल्या या नव्या फ्युजनच्या सादरीकरणाबद्दल आनंद शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply