मराठी चित्रपट ‘शिकारी’ 20 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस

Marathi Movie 'Shikari'
Kashmira Shah, Mahesh Manjrekar, Suvrat Joshi, Neha Khan, Mrunmayee Deshpande, Viju Mane , Marathi Movie ‘Shikari

शिकारी‘ हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी प्रस्तुत केला असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मराठी मलिका ‘दिल दोस्ती दुनियादारी‘ने घराघरात पोहोचलेला आणि स्वतःचे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला सुव्रत जोशी आणि नेहा खान या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा खान या चित्रपटातून चित्रपटसृष्टीतील आपले पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधवभारत गणेशपुरे, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.

अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत ‘शिकारी‘ या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. ‘शिकारी‘ चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा धांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.

Leave a Reply