‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये ५०० हून अधिक मुलांचा सहभाग

Pune Audition Image
Pune Audition

सूर नवा ध्यास नवा–छोटे सुरवीर‘ कलर्स मराठी वरील या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर नंतर पुण्यामध्ये या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला. मुलांचा उत्साह आणि त्यांची तयारी वाखाणण्याजोगी होती. सगळीच मुलं प्रचंड तयारीने आली होती. कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये ५०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. पुणे येथील इ. एस. सेकंडरी स्कूल, ४८६ सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल कॅम्पस, टिळक रोड येथे या ऑडिशन्स पार पडल्या. या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे.

कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे. ‘सूर नवा ध्यास नवा‘ छोटे सूरवीरच्या पुणे केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडीशन्ससाठी आठ स्पर्धक निवडण्यात आले. श्रीनिधी देशपांडे, नंदिनी गायकवाड, ईशिता मोडक, अक्षय चारभाई, धिरज शेगर, चैतन्य देवडे, आदी भारतीया आणि अभिषेक कांबळे यांची निवड झाली आहे. पुणे ऑडिशन्सला आलेल्या बऱ्याच स्पर्धकांनी त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे मने जिंकली परंतु या आठ स्पर्धकांना मुंबईला येऊन मेगा ऑडिशन्स मध्ये त्यांचे गाणे सादर करण्याची संधी मिळाली. आता ऑडीशन्स नागपूर मध्ये रंगणार आहे.

Leave a Reply