‘गाथा नवनाथांची’ (Gatha Navnathanchi)या सोनीमराठी वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे नाथसंप्रदायाविषयीची माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना विशेष भावतेय. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ यांसारख्या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरत असतानाच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा नुकताच गाठला आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती असं सगळं या मालिकेत पाहायला मिळालं, नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेच्या पुढल्या भागांत पाहणं रंजक ठरणार आहे. बालक रेवणनाथांचा नाथपंथाच्या दिशेकडील प्रवास आता मालिकेत सुरू झाला आहे. या मालिकेतील कलाकारांच्या भूमिकेचे विशेष कौतुकही होतंय.
Read More