रोमॅंटिक आणि थ्रिलरचे कॉम्बिनेशन असलेला ‘शॉर्टकट’
विज्ञानाची होणारी जलद गतीची प्रगती आपल्याला उपयुक्त जरी ठरत असली तरी दुसऱ्या बाजूला ह्या प्रगतीचा गैरवापरदेखील जगात मोठ्या प्रमाणात होत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हल्लीची युवापिढी पैसा, प्रसिद्ध मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ चा मार्ग अवलंबायला जराही मागे पुढे पाहात नाही, पण हाच ‘शॉर्टकट‘ कधीतरी वेगळं वळण घेउन आपल्याला घातक ठरू शकतो याचा जराही विचार या तरुण मंडळीना नसतो.
दिवसेंदिवस सायबर क्राइमसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कमालीची वाढ होत आहे.
‘सायबर क्राइम’ सारखा अत्यंत ज्वलंत विषय ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, या आगामी सिनेमातून मांडण्यात आला आहे. एम के मोशन पिक्चर्स चे मुकेश चौधरी आणि चित्रकार फिल्म्सचे बी. आर. देढीया यांची निर्मिती असलेल्या ‘शॉर्टकट’ सिनेमाचे दिग्दर्शन हरीश राऊत यांनी केले असून त्यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
राजेश शृंगारपुरे, वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाची कथा हरीश राऊत यांची असून पटकथा हरीश राऊत, विनय नारायणे आणि राजेश बाळापुरे यांची आहे, तर संवाद विनय नारायणे यांचे आहेत.शकील खान यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिले असून या सिनेमात रॉक संगीतासोबतच रोमॅंटिक संगीताची मेजवानी आपल्याला मिळणार आहे.
रोमॅंटिक आणि थ्रिलरचे कॉम्बिनेशन असलेला ‘शॉर्टकट‘ हा सिनेमा ७ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.