राजा चित्रपटातून उलगडणार प्रेमातील नवे पैलू

Marathi movie 'Raja'
Marathi movie ‘Raja

राजा‘ या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने आजवर समोर न आलेले प्रेमातील नवे पैलू आपल्यासमोर येणार आहेत. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा‘ या सिनेमाची कथा सादर केली आहे.

निर्माते प्रवीण काकड यांनी ‘सत्यसाई मल्टिमिडीया प्रा. लि.‘ या संस्थेअंतर्गत ‘राजा‘ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शनासोबतच सिनेमाच्या लेखनाची जबाबदारीही शशिकांत देशपांडे यांनी सांभाळली आहे. ‘राजा‘ या सिनेमाची कथा एका पॅाप सिंगरच्या जीवनावर आधारित आहे. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून राजा’ ची कथा सादर केली आहे. राजाच्या जीवनात येणाऱ्या दोन्ही नायिका त्याला त्याच्या प्रवासात यथोचित साथ देतात.

नवोदित अभिनेता सौरदीप कुमार , स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे याखेरीज शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, मिलिंद इनामदार, पौरस आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत.

Leave a Reply