तरुणांची बाजु मांडणारा ‘युथ’
व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित ‘युथ’ या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन ‘युथ’ सिनेमामधून भविष्याचे व समाजाचे आशादायी चित्र निर्माण करतो.
एन चंद्रा, गिरीष घाणेकर या सारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव, नामांकित कंपन्याच्या जाहिरातींचं दिग्दर्शन, संकलन अशी मुशाफिरी करणाऱ्या राकेश कुडाळकर यांचासिनेमा दिग्दर्शनाचा हा पहिला प्रयत्न आहे.
या सिनेमाचे संवाद विशाल चव्हाण व युग यांनी लिहिले आहेत. सिनेमातील गीतांनाही तरुणाईचा स्वर लाभला असून आजचे आघाडीचे गायक जावेद अली व गायिका शाल्मली खोलगडे यांनी यातील गीते गायली आहेत. विशाल-जगदीश यांनी सिनेमाला साजेसं संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांची आहे. चेतन शिंदे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे.
विक्रम गोखले, नेहा महाजन, अक्षय वाघमारे,मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. लवकरच ‘युथ’ च्या चित्रीकरणाला कोल्हापूरात सुरूवात होणार आहे.