Tag Archives: मराठी

‘मन उगाच हासते कशामुळे’ गाण्याला जावेद अलीचे स्वर

Javed Ali Singer Sings Memory Card Song
Javed Ali Singer

जावेद अली ने आत्तापर्यंत अनेक गाण्यांना आपले स्वर दिले आहेत. प्रत्येक गाण्याची एक वेगळीच मेलडी असते जी मी अनुभवली आहे. मात्र ‘मेमरी कार्ड‘ सिनेमातील लव्ह सॉंगने माझ्यासाठी सॉंग ऑफ द इयर असेल. या गाण्याचा मी पुरेपूर आनंद लुटला. प्रितेश कामत आणि मितेश चिंदरकर यांनी दिलेलं संगीत माझ्या काही खास कंपोझिशन्स मध्ये राहील. येत्या २ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाची मी आतुरतेने वाट पाहतोय.

माझे गुरु आणि संगीतातील आयडियल महोम्मद रफी यांच्या गाण्यांना असलेला गोडवा साधेपणा या दोघांनी नेमके पणाने या गाण्यात उतरविला. प्रेम ही एकमेव भावना जी जगाच्या पाठीवर कायम आणि सारखीच आहे अशी भावना गाण्यात ऐकायची असेल तर प्रितेश-मितेश यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ‘मन उगाच हासते कशामुळे, हृदय ही धडकू लागते कुणामुळे‘!… ‘मेमरी कार्ड‘ सिनेमातील एव्हरग्रीन सॉंग रेकॉर्ड करताना मी सुद्धा जवळपास दोन तास घेतले आणि त्यातील प्रत्येक क्षण माझ्या मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करून घेतला.

सरस्वती मालिकेमध्ये सरस्वती आणि दुर्गा येणार समोरासमोर

Marathi serial 'Saraswati' On Colors Marathi
Marathi serial ‘Saraswati’

सरस्वती‘ मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या. सरस्वती – राघवची भेट होताता राहण, भुजंगच सरस्वती आणि देवाशिषचे लग्नं होत असतानाचं मोठं नाटकं रचण. मग सरस्वतीचे वाड्यामध्ये भुजंगची पत्नी म्हणून जाणं. हि सगळी खेळी भुजंग अगदी सफाईदार पणे खेळत आला आहे. आता येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना सरस्वती आणि मोठ्या मालकांमधील प्रेमाचे काही क्षण बघता येणार आहेत. मोठे मालक म्हणजेच राघव जसे सरस्वतीवर प्रेम करायचा, तिची काळजी घ्यायचा हे सगळ पुन्हाएकदा घडणार आहे.

सरस्वती‘ मालिकेमध्ये या आठवड्यामध्ये राघव सरस्वतीला इस्पितळातमध्ये घेऊन जाणार आहे. पण, राघव अनभिज्ञ आहे कि, तो दुर्गाला नाही तर सरस्वतीलाच इस्पितळात घेऊन जातो आहे. जिथे त्याला हे सत्य कळणार आहे कि, सरस्वती आता फक्त काही महिनेच आपल्यासोबत असणार आहे, जे ऐकून राघव पूर्णपणे खचून जाणार आहे. सरस्वती खूप मोठ्या प्रश्नात आहे कि, राघव तिची इतकी सेवा, काळजी का करत आहे ? तिला कुंकू लावणे, खाऊ घालणे.

रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘गडबड झाली’चा मुहूर्त संपन्न

Marathi movie 'Gadbad Zali'
Vikas Patil, Akshata Patil, Rajesh Shringarpure, Neha Gadre & others, Marathi movie ‘Gadbad Zali

फिल्मसिटीत एका साहसी पाठलाग दृश्याच्या चित्रिकरणाने सगळ्यांचे लक्षवेधूनघेतले, या दृश्याच्या चित्रीकरणाने मराठी चित्रपट ‘गडबड झाली‘चा मुहूर्त झाला. प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्सची निर्माती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संतराम यांचे असून याचे निर्माते डॉ. जितेंद्र राठोड आहेत. सहनिर्माते रमेश रोशन यांनी चित्रपटाला संगीत दिले असून अजय सिंह मल्ल निर्मिती सूत्रधार आहेत.

या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे राजेश शृंगारपुरे, विकास पाटिल, मोहन जोशी, नेहा गद्रे, उषा नाडकर्णी, संजय मोहिते, अक्षता पाटिल अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. ‘गडबड झाली‘ चित्रपटाच्या नावावरूनच प्रेक्षकांना कल्पना येईल कि हा चित्रपट गोंधळात गोंधळ स्वरूपाचा आहे.
सध्या मुलींनी पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढते आहे, पण हे प्रेमविवाह जास्त काळ टिकत नाहीत, याची कारणे काय असतील यावर हा सिनेमा प्रकाश टाकतो. पळून गेलेल्या मुलींना कशाचा सामना करावा लागतो, ते या चित्रपटात सादर होते. हिंदी मालिकांमध्ये लक्षणीय ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक संतराम यांच्या मते चित्रपटाच्या मराठी चित्रपट दिग्दर्शित करणे आव्हानात्मक आहे, पण तगड्या स्टारकास्टमुळे ते सहज साध्य झाले आहे. प्रेक्षकांना ‘गडबड झाली’ हा चित्रपट नक्की आवडेल असा त्यांना विश्वास आहे.

‘तू तिथे असावे’ चित्रपटात भूषण प्रधान आणि पल्लवी पाटीलची हळवी प्रेमकथा

Marathi Film 'Tu Tithe Asave'
Bhushan Pradhan and Pallavi Patil, Marathi Film ‘Tu Tithe Asave’

अभिनेता भूषण प्रधान स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात अभिनेत्री पल्लवी पाटील त्याच्या सोबत आहे. ‘तू तिथे असावे‘ या आगामी मराठी सिनेमातून भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा लवकरच आपल्यासमोर उलगडली जाणार आहे. या चित्रपटातील ‘रोज रोज यावे तू स्वप्नात माझ्या, धुंद बेधुंद व्हावे मी स्वप्नात माझ्या‘ असे बोल असलेले मधुर प्रेमगीत नुकतेच चित्रित करण्यात आले.

नयनरम्य लोकेशन्सवर शूट करण्यात आलेले हे गीत करताना एक वेगळाच मूड जमून आला. तसेच अनाहुतपणे ओठांवर सजणारं हे गीत तरल प्रेमाची अनुभूती देईल असा विश्वास भूषण व पल्लवीने व्यक्त केला. श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला बेला शेंडेस्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज लाभला आहे. दिनेश निंबाळकर यांनी संगीत दिले आहे तर जीतसिंग यांनी गीताचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे‘ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत.

भूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचं आहे.

‘व्हिडिओ पार्लर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Marathi movie 'Video Parlour'
Marathi movie ‘Video Parlour

पहिल्याच ‘रंगा पतंगा‘ या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा पुढचा चित्रपट ‘व्हिडिओ पार्लर‘ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (पिफ) निवडला गेला आहे. पिफमधील मराठी सिनेमा टुडे या विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात प्रदर्शित करण्यात आला आहे.

हृदया सिनेक्राफ्टचे डॉ. श्रीयांश कपाले आणि ओम्स आर्ट्सच्या डॉ. संतोष पोटे यांनी ब्लिंग मोशन पिक्चर्सचे सागर वंजारी यांच्या सहकार्याने ‘व्हिडिओ पार्लर‘ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता संदीप पाठक, ओंकार गोवर्धन, कल्याणी मुळे, गौरी कोंगे, पार्थ भालेराव, रितेश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन प्रसाद नामजोशी यांनी केलं आहे.
चित्रपट करण्यासाठी विषय शोधत दिग्दर्शक असलेला विक्रम त्याच्या मूळ गावी जातो. तिथं गेल्यानंतर त्याला त्याच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. व्हिडिओ पार्लरमध्ये तो ज्याच्याबरोबर चित्रपट पहायचा, त्या बालमित्रालाला वीस वर्षांमध्ये भेटलेला नाही. त्याचं यशापयश, प्रेम, अपमान, मित्राचं आयुष्य या सगळ्यातून त्याला मिळालेला चित्रपटासाठी विषय असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे.

‘कुठे हरवून गेले…’ गाणे केतकी माटेगावकरच्या सुरेल आवाजात

Marathi movie 'What’sUp लग्न'
Singer Ketaki Mategaonkar , Marathi movie ‘What’sUp लग्न’

कर्णमधुर संगीत.. आणि मंत्रमुग्ध करणारा तरल आवाज हे प्रत्येक यशस्वी चित्रपटाचे गमक मानलं जातं. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्यातील गाणी जेव्हा रसिकांच्या ओठी रुळतात तेव्हा त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच शिगेला पोहचते. सध्या अशीच उत्सुकता मराठी चित्रपटसृष्टीत पहायला मिळतेय, ती म्हणजे ‘What’s Up लग्न‘ या चित्रपटाच्या निमित्ताने.
क्षितीज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘कुठे हरवून गेले..’ या हृदयस्पर्शी गीताला केतकी माटेगावकरच्या सुरेल आवाजाची साथ लाभली आहे तर ट्रॉय-आरिफ यांनी आपल्या जादुई संगीताने या गाण्याला चारचाँद लावलेत असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कुठे हरवून गेले‘ या गाण्याची उत्सुकता ताणून ठेवत निर्माते-दिग्दर्शकांनी या गाण्याचा चित्रपटातील व्हिडियो प्रसिद्ध न करता त्यासाठी एक खास व्हिडियो अल्बम बनवला आहे. ‘डान्स प्लस’ या गाजलेल्या रिअॅलिटी शोमधील पल्लवी आणि ऋषभ ही जोडी अल्बमसाठी निवडली गेली. फुलवा खामकर यांच्या नृत्यदिग्दर्शनखाली या गाण्यावर सेन्शुअस कंटेम्परी डान्स स्टाईल कोरिओग्राफ केली आहे .
फिनक्राफ्ट मीडिया निर्मित, जाई जोशी आणि व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत ‘What’s Up लग्न‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरेची ही लव्हेबल केमिस्ट्री लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत पाहू शकाल.

‘हा! मी मराठा’ अॅक्शनपट जानेवारीत प्रदर्शित

Marathi Movie 'Ha Mi Maratha'
Marathi Movie ‘Ha Mi Maratha’

कॉलेज आणि कॉलेजचे दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. मग त्या मित्रांच्या गोष्टी असोत किंवा शिक्षकांच्या असोत. आपण नंतर कितीही वर्षांनी आपल्याला त्या नक्कीच आठवतात. अशाच प्रकारचे कथानक असलेला अॅक्शनपट ‘हा! मी मराठा‘ येत्या २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माते अमृता राव, आकाश राव, सहनिर्माते मोहन सचदेव यांनी आपल्या स्पंदन फिल्मस् आणि रेमोलो एंटरटेनमेंट निर्मितीसंस्थे अंतर्गत या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे असून या सिनेमात अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यांच्या सोबत विशाल ठक्कर, यतीन कार्येकर, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आशिष पवार, सविता प्रवीण, मेघा घाडे आणि भूषण कडू आपल्याला दिसणार आहेत.

मिलिंद नारायण, गुरु शर्मा यांनी ‘हा! मी मराठा‘ सिनेमाला संगीत दिले असून गाण्यांना वैशाली सामंत, कैलाश खेर, शान, सुनिधी चौहान या गायकांचा आवाज लाभला आहे. कथा निहारिका यांची असून पटकथा आणि सवांद प्रदीप राणे यांचे आहे. सिनेमाची गोष्ट शिवा पाटीलच्या भोवती गुंफण्यात आली आहे. साधा, भोळा असला तरी हा शिवा हुशार आहे. त्याच्या आईच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तो मुंबईतल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो आणि तिथूनच ‘हा! मी मराठा‘ सिनेमाची सुरुवात होते.

‘राक्षस’ या चित्रपटात दिसणार शरद केळकर आणि सई ताम्हणकर

Marathi movie 'Raakshas'
Sharad Kelkar in Marathi movie ‘Raakshas

निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस‘ असे हटके नाव असलेला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत एक जबरदस्त ‘बाहुबली’ आवाज असलेला अभिनेता आपल्या भेटीला येणार आहे, ज्याने संग्राम ही खलनायकाची ‘लय भारी’ भूमिका साकारत तमाम मराठी रसिकांची मने जिंकली होती तो अभिनेता म्हणजे शरद केळकर. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी नवीन, फ्रेश जोडी प्रेक्षकांना ‘राक्षस‘ ‘या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शरद केळकर अविनाश ही व्यक्तीरेखा यामध्ये साकारत असून तो एक डॉक्यूमेंट्री मेकर आहे, त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ‘राक्षस’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

राक्षस‘ असा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारेआल्याशिवाय रहात नाहीत. राक्षसाची विविध रूपेआजपर्यंत आपण गोष्टींमध्ये ऐकलेलीआहेत. आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचं ‘राक्षस‘च लेखन अनुभवसिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत.
शरद केळकरचा वेगळा लुक असलेल्या या नव्या पोस्टरमुळे ती अजून ताणली गेली आहे. या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय गुढ दडले आहे याची उकल येत्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे.

‘लव्ह लग्न लोचा’ ही मालिका सोमवारपासून नव्या वेळेत

Saksham Kulkarni, Sameeha Sule in serial 'Love Lagna Locha'
Saksham Kulkarni, Sameeha Sule in serial ‘Love Lagna Locha’

सध्या सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता झी युवा ह्या वाहिनी वर प्रेक्षकांच्या भेटीला येते असलेली मलिका ‘लव्ह लग्न लोचा ‘ ही उद्या, १८ डिसेंबर पासून नविन वेळेवर म्हणजे रात्री ९ वाजता दिसणार आहे.

सध्या या मालिकेत प्रेक्षकांचं आवडतं जोडपं म्हणजेच विनय (सक्षम कुलकर्णी) आणि आकांक्षा (समीहा सुळे) चे फायनली लग्न होणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना राघवाची मा साहेबाना भेटण्याची इच्छा होती त्या मा साहेब म्हणजेच अभिनेत्री शुभांगी लाटकर यांची एंट्री होणार आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांच्या   अभिनयाला प्रेक्षक मनापासून दाद मिळत असल्याचे समजते।

प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची प्रेमकथा ‘राधा प्रेम रंगी रंगली’

Marathi Serial 'Radha Prem Rangi Rangli'
Veena Jagtap & Sachit Patil , Marathi Serial ‘Radha Prem Rangi Rangli

प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे पण ‘राधा प्रेम रंगी रंगली‘ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एकासाठी लग्न म्हणजे केवळ एक व्यवहार आहे आणि दुसऱ्यासाठी लग्न म्हणजे संसार ! कसा रंगेल या प्रेमकहाणीचा करार ? महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री कविता लाड – मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, वीणा जगताप, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपाराजीत मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

राधा ही आजची कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे जिचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. तर प्रेम व्यवहारचातुर्याने वागणारा, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणारा आणि ज्याचं लग्न, कुटुंब, प्रेमं याच्यावर मुळीच विश्वास नाही असा मुलगा आहे. अशी दोन परस्परविरोधी स्वभावाची ही दोन पात्र लग्नबंधनामध्ये अडकतात आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते.
राधा प्रेम रंगी रंगली‘ मालिकेचे दिग्दर्शन वीरेंद्र प्रधान करणार आहेत. आघाडीचे कलाकार आणि वेगळा विषय यामुळे आम्हाला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तेंव्हा बघायला विसरू नका प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची ही कथा, ‘राधा प्रेम रंगी रंगली‘ २४ नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.