‘ मृणालताई करंडक २०२२’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
विकास आणि सोनालीमध्ये यावरून झाले मतभेद, सोनाली पाटील विकासवर भडकली
बिग बॉस मराठीच्या सदस्यांचे वादविवाद, एखाद्या विषयावरून होणारे मतभेद, त्यांच्यातील भांडण, मारामारी हे आपण बघतच असतो. आज असंच काहीसं झाले विकास आणि सोनालीमध्ये. एका मुद्द्यावरून या दोघांमध्ये मतभेद होताना दिसणार आहेत. नक्की कशावरून ही चर्चा सुरू झाली हे आजच्या भागामध्ये कळेलच.
Actress Mira Jagannath, Contestants of bigg boss Marathi 3
विकासचे म्हणणे आहे, मागील आठवड्यात आणि त्याआधी पण बोले होते. बाकी काही असलं तरी एकमेकांना loyal तरी आहेत. loyalty आली की तुमची जरा गडबड होते. सोनाली पाटील त्यावर म्हणाली, loyalty च्या बाबतीत मी मीनलवर कधीच अविश्वास दाखवणार नाही कारण आतापर्यंत ती फक्त आपल्यासाठी खेळली आहे, स्वत:साठी खेळली आहे. त्यामुळे अविश्वास दाखवणं, loyalty न दाखवणं हा विषय येतंच नाही. संभाषण सुरू असताना सोनालीने विकासला खडसावून सांगितले तू चेष्टेवारी घेणार असशील तर मी बोलत नाही. विकास त्यावर म्हणाला, तू आता दोन contradictory statement केलेस ना आता… सोनालीचे म्हणणे आहे ते महत्वाचे नाही आता मी बोलते महत्वाचे ते आहे. कुठेनाकुठे तू अविश्वास दाखवतो आहेस… आणि पुढे या दोघांची चर्चा अशीच सुरू राहिली.
जीव माझा गुंतला मालिकेत अंतराला मिळणार “हमसफर” ची साथ !
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेमध्ये अंतरा आणि ‘हमसफर’चं नातं खूप खास आहे. शितोळे परिवाराला पैशांची कमतरता भासू नये, आई वडिलांना कुठलाही तरस होऊ नये म्हणून अंतरा रिक्षा पुन्हा एकदा चालविण्याचा निर्णय घेणार आहे. लग्न झाल्यावर आपल्या माहेरी हातभार लावावा, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे प्रत्येक मुलीला वाटतं असते आणि तशीच इच्छा आपल्या अंतराची देखील आहे. पण आता तिचा हा निर्णय कुठलं नवं संकट तिच्या पुढे घेऊन येणार? खानविलकर कुटुंबाची साथ अंतराला मिळेल का ? ती कसा यातून कसा मार्ग काढणार ? चित्रा यामध्ये कुठली नवी खेळी खेळून जाणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
अंतरा रिक्षा चालविण्याचा जेव्हा निर्णय घेते तेव्हा ती सुवासिनी यांना सांगण्याचा प्रयत्न देखील करते आणि ती तसं सांगते देखील. पण, तसं करून सुध्दा त्या दोघींमध्ये गैरसमज का होतो ? सुवासिनी आणि अंतरा मध्ये गैरसमज दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मल्हारने देखील अंतराला अजून बायको म्हणून स्वीकारले नाहीये. अंतरा कुठेतरी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्या सगळ्यामध्ये आता हे नवं संकट तिच्यासमोर उभे ठाकणार आहे. अंतराच्या या निर्णयाचा मल्हार आणि अंतराच्या नात्यावर काय परिणाम होईल ? जाणून घेण्यासाठी बघत रहा जीव माझा गुंतला दररोज रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
आनंदी जोशी हिचा सुमधूर आवाजात ‘श्री सुक्तम’
भक्तांचा यंदाचा नवरात्रोत्सव होणार आहे अधिकच चैतन्यमय दुर्गा देवी व नवरात्रोत्सव स्त्री शक्तीचा एक जागरच मानला जातो. देवीची आराधना करण्यासाठी मंत्रांचे उच्चारण केले असता पावित्र्याची आणि मांगल्याची अनुभूती होते. मंत्रोच्चाराने मन प्रसन्न होते. ‘सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि’, प्रस्तुत ‘श्री सुक्तम’ हा मंगलमय मंत्र व्हीडीयो रूपात भक्तांच्या भेटीला आला आहे. विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उमा पेंढारकर ‘श्री सुक्तम’ हा मंत्र म्हणत देवीची उपासना करताना दिसत आहे.
भारतीय पुराणात मंत्र परंपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे. ‘श्री सुक्तम’ या मंत्राला चिनार-महेश यांनी संगीत दिले असून आनंदी जोशी हिचा सुमधूर आवाज लाभला आहे. मंत्रांचे उच्चारण केल्याने तयार होणाऱ्या ध्वनी लहरींमुळे आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लवकरच सगळीकडे देवीचे आगमन होणार असून तिच्या आगमनाने चैतन्यमय झालेले वातावरण ‘श्री सुक्तम’ च्या मंत्रोच्चाराने अधिकच उत्साहवर्धक होणार आहे.
‘ज्ञानेश्वर माउली’! – २७ सप्टेंबरपासून सोनी मराठीवर
महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०२१ हे ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचं ७२५ वं वर्ष आहे. यानिमित्त प्रेक्षकांना दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे.
‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.
‘ज्ञानेश्वर माउली’, २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर…
‘वन मिनिट सॉंग’ मधून ऐकायला मिळणार नाटकातली गाणी
मराठी चित्रपटातील गाणी आपल्याला ऐकण्यासाठी सर्वत्र उपलब्ध असतात, पण मराठी नाटक हे रसिकांना नाट्यगृहात जाऊन पाहावं लागतं, अनेकवेळा नाटकासाठी खास काही गाणी बनवली जातात ती लोकप्रिय होतात, पण नाटकाचे प्रयोग बंद पडल्यानंतर क्वचितच ती रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध होतात. त्यामुळेच नाटकातील काही गाणी व्हिडीओ स्वरूपात आणण्याचा एक नवीन प्रयोग मधुसूदन कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केला आहे.
‘सुख दुःख सारी..’ हे त्यातलच एक गाणं नुकताच प्रदर्शित झाले आहे, नाटकातील गाणे असल्यामुळे या गाण्याची लांबी जेमतेम सव्वा मिनिट असून, आई आणि मुलीची ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या गाण्यातून निर्माती पूनम शेंडे आणि बालकलाकार सारा पालेकर प्रथमच अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहेत. हे गाणं गायिका आनंदी जोशीच्या आवाजात स्वरबद्ध झाले असून ते अक्षय संत यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याला स्वप्निल सावंत आणि जीवन मराठे यांनी संगीतबद्ध केलेले असून याची अरेंजमेंट सत्यजित केळकर यांनी केली आहे.
या अभिनव प्रयोगाबद्दल बोलताना दिग्दर्शक योगेश तवार म्हणाले कि “एक ते सव्वा मिनिट लांबीच्या गाण्यात स्टोरी दाखवणं हे एक आव्हान होतं पण टीमने ते अतिशय सुरेख पद्धतीने चित्रित करण्यात यश मिळवलं आणि एक छोटीशी सुंदर पटकथा चित्रित केली. ‘सुख दुःख सारी’ या गाण्याचा प्रवास खूप मजेदार होता आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल”.
सायली देवधर दिसणार सोनी मराठीवरील नव्या मालिकेत – ‘वैदेही’
अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली ‘वैदेही’ ही मालिका 16 ऑगस्टपासून सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय.
या मालिकेत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत. रामभक्त वैदेही येतेय प्रेक्षकांच्या भेटीला. पाहायला विसरू नका, नवी मालिका, ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते, 16 ऑगस्टपासून सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर.
‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे
सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले आहेत. ‘श्रीमंताघरची मुलगी’, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे.
या मालिकेत देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. सुप्रियांच्या ह्या नवीन भूमिकेबद्दल नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर. ‘श्रीमंताघरची सून’ हि मालिका सोम.-शनि., रात्री ८ वा. प्रदर्शित होत असून तिच्या ह्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल.
‘हरीओम’ टीमतर्फे कोरोनायोद्धांना, गरजुंना मदत
अवघ्या जगावर कोरोनाचे सावट असून आज प्रत्येक जण आपापल्या परीने कोरोनायोद्धांना, गरजुंना मदत करत आहेत. अशीच कौतुकास्पद कामगिरी पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘हरिओम’ चित्रपटाचे निर्माता, अभिनेता हरिओम घाडगे आणि त्यांच्या टीमने केली. बिरवाडी एमआयडीसी येथील कोविड सेंटरसाठी, सरकारी आरोग्य केंद्र, रायगड पाचाड आरोग्य केंद्र आणि वरंडोली ग्रामस्थांना स्टीमरचे विनामूल्य वाटप केले. तसेच आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील गरजुंना अन्नधान्यांचे वाटप केले.