मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!
महाराष्ट्रात लग्न समारंभाचा कार्यभाग म्हणून जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मकरंद अनासपूरे (Makarand Anaspure) आणि तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) यांनी ‘छापा काटा’ (Chappa Kata) चित्रपटात लग्नाच्या शुभ प्रसंगी देवदेवतांच्या आगमनासाठी जागरण गोंधळ मांडत जपली आहे. मल्हारी मार्तंड आणि रूपसुंदरी म्हाळसा ते कारल्याच्या एकवीरा आईचा उदो उदो करणारं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ (Aai tujhya navane gondhal mandala) गोंधळगीत ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून अवघा महाराष्ट्र उत्साहाने झिंगणार असल्याचं दिसत आहे.
शशांक कोंडविलकर यांनी गीताला शब्दबद्ध केले असून गणेश सुर्वे यांनी उत्स्फूर्त संगीत दिले आहे. गौरव चाटी यांनी देवतांच्या भक्तीत सर्वांनी विलीन व्हावे असे स्वर या गीतास दिले आहेत. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. येत्या १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहात ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ या गोंधळगीताचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.