प्रवीण कुवर यांच्या आवाजातील ‘फुगडी’ या गाण्याचे रेकॉर्डींग नुकतेच पार पडले
झी मराठी वरील “लगीर झालं जी “या लोकप्रिय मालिकेचे पार्श्वगीत, लव्ह लफडे चित्रपटातील ‘ताईच्या लग्नाला’ यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांचे अजून एक नवे चित्रपट गीत लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. दुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि निलेश पाटील निर्मित ‘फुगडी’ या गायक प्रवीण कुवर यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डींग नुकतेच युफोनी स्टुडिओ, अंधेरी पश्चिम येथे पार पडले.
दुर्वा एंटरटेन्मेंट प्रस्तुत फुगडी हे एक मराठी सोबतच हिंदी टच असलेलं भन्नाट गाणं लवकरच चेतन कुमावतच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हिंदी टच व्यतिरिक्त इतर अनेक गमती जमती या गाण्यात पाहायला मिळणार आहेत. या गाण्यावर अभिनेता चेतन कुमावत थिरकणार असून चेतनने याआधी बरीच व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले असून, कलर्स मराठी वरील कुंकू टिकली टॅटू या मालिकेत काम केले आहे.