Tag Archives: Gatha Navnathanchi

‘गाथा नवनाथांची’ मालिकेने गाठला ४०० भागांचा टप्पा

Sony Marathi's Serial 'Gatha Navnathanchi'
Sony Marathi’s Serial ‘Gatha Navnathanchi’

‘गाथा नवनाथांची’ (Gatha Navnathanchi)या सोनीमराठी वाहिनीवरील  मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे नाथसंप्रदायाविषयीची माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना विशेष भावतेय. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ यांसारख्या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी  रंजक ठरत असतानाच  या मालिकेने ४०० भागांचा टप्पा नुकताच गाठला आहे.

आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती असं सगळं या मालिकेत पाहायला मिळालं,  नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेच्या पुढल्या भागांत पाहणं रंजक ठरणार आहे. बालक रेवणनाथांचा नाथपंथाच्या दिशेकडील प्रवास आता मालिकेत सुरू झाला आहे.  या मालिकेतील  कलाकारांच्या भूमिकेचे विशेष कौतुकही होतंय.

गाथा नवनाथांची (Gatha Navnathanchi)


Marathi Serial: Gathaa Navanathanchi
On Air : 21Jun 2021
Channel: Sony Marathi
Timing:  Monday to Saturday , 6.30 pm
Actors: Jayesh Shewalkar, Aniruddha Joshi, Nakul GHanekar, Shantanu Gangane

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘गाथा नवनाथांची’.

महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gatha Navnathanchi on Sony Marathi
Gatha Navnathanchi on Sony Marathi

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. या मालिकेत मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत जयेश शेवाळकर दिसणार आहे, तर अनिरुद्ध जोशी गोरक्षनाथांची भूमिका साकारणार आहे. नकुल घाणेकर आणि शंतनू गंगणे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत.

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे.