Tag Archives: Marathi

कलर्स मराठीवर ‘गणपती बाप्पा मोरया’ प्रेक्षकांच्या भेटीला

ganapati-bappa-morya-serial-analesh-desai-colors-marathi

लहानापासून मोठ्यांपर्यंत, अगदी सगळ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पांची गाथा पौराणिक मालिकेच्या रूपाने सादर होत असून, या मालिकेचा शुभारंभ उद्यापासून (२४ नोव्हेंबर) होत आहे .‘जय मल्हार’ च्या यशा नंतर महेश कोठारे ह्यांच्या, कोठारे विजन द्वारा निर्मित ‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ‘कलर्स मराठी‘ ह्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका पार्वती – गणेश या मातापुत्राच्या ममतेच्या अलौकिक नात्याचे विविध पदरही उलगडणार आहे. या मालिकेत बाप्पांच्या प्रचलित आणि सर्वश्रुत असलेल्या गोष्टींसोबत काही अपरिचित कथाही बघायला मिळतील. या मंगलमय गणेशकथांसह शिवपार्वती आणि इतर देवदेवतांचे दिव्य दर्शन, तसेच डोळे दिपवून टाकणारे शिवालय, नयनरम्य नंदनवन ही पावित्र्याची प्रतीके सर्व महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करतील. असा विश्वास या मालिकेचा निर्माता आणि क्रिएटिव दिग्दर्शक आदिनाथ कोठारे ह्याने दर्शिवला.

एकंदरीतच उत्तम अभिनय, अभ्यासपूर्ण कथा आणि उच्च तंत्राद्यानाच्या सहाय्याने मांडलेल्या अश्या पौराणिक कथा नक्कीच प्रेक्षेकांमध्ये लोकप्रिय होतात. गणपती बाप्पांची हि नव्या स्वरूपातील तेजोमय गाथा, इतर पौराणिक मालीकेंच्या तुलनेत हि नवी मालिका प्रेक्षेकांना किती पसंतीची पडते ते लवकरच कळेल.

व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

Nitin Desai, Art Directorव्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टच्यावतीने युवाव प्रस्थापित चित्रकर्मींसाठी ‘सिने कल्चरल सेंटर’च्या अंतर्गत सिनेमा मेकिंग तंत्राचे मार्गदर्शन आणि विशेष चर्चासत्राचे आयोजन नुकतेच (१९ एप्रिल  रोजी)मुंबईत करण्यात आले होते. ह्या मार्गदर्शन कार्यक्रमास प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई ह्याचे मार्गदर्शन लाभले.

‘चाणक्य’, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या मालिकांपासून ते ‘देवदास’ ह्या हिंदी सिनेमा पर्यंत असंख्य चित्रपटांच्या सेट्सच्या निर्मितीसाठी केलेला तेथील संस्कृती, इतिहास आणि भौगोलिक स्थानांचा अभ्यास, कला दिग्दर्शनाचे बारकावे याच्या चित्रफिती यावेळी दाखवण्यात आल्या, तसेच सेट्सच्या निर्मितीची प्रात्यक्षिकं त्यांनी याप्रसंगी सादर केली. बी.डी.डी. चाळीपासून सुरु झालेला प्रवास,कला दिग्दर्शन क्षेत्रातला संघर्ष, मातब्बर निर्माता-दिग्दर्शकांची मिळालेली साथ, मिळालेला मान-सन्मान, पारितोषिक आणि भविष्यातील योजना याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे  दिपप्रज्वलन सांस्कृतिक कार्यसंचालनालयाचे संचालक, आशुतोष घोरपडे  ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.  कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत असे आवर्जून नमूद केले.  श्री. किरण शांताराम यांनी नितीन देसाई यांचे आभार व्यक्त केले.