कलर्स मराठीवर ‘गणपती बाप्पा मोरया’ प्रेक्षकांच्या भेटीला
लहानापासून मोठ्यांपर्यंत, अगदी सगळ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पांची गाथा पौराणिक मालिकेच्या रूपाने सादर होत असून, या मालिकेचा शुभारंभ उद्यापासून (२४ नोव्हेंबर) होत आहे .‘जय मल्हार’ च्या यशा नंतर महेश कोठारे ह्यांच्या, कोठारे विजन द्वारा निर्मित ‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ‘कलर्स मराठी‘ ह्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका पार्वती – गणेश या मातापुत्राच्या ममतेच्या अलौकिक नात्याचे विविध पदरही उलगडणार आहे. या मालिकेत बाप्पांच्या प्रचलित आणि सर्वश्रुत असलेल्या गोष्टींसोबत काही अपरिचित कथाही बघायला मिळतील. या मंगलमय गणेशकथांसह शिवपार्वती आणि इतर देवदेवतांचे दिव्य दर्शन, तसेच डोळे दिपवून टाकणारे शिवालय, नयनरम्य नंदनवन ही पावित्र्याची प्रतीके सर्व महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करतील. असा विश्वास या मालिकेचा निर्माता आणि क्रिएटिव दिग्दर्शक आदिनाथ कोठारे ह्याने दर्शिवला.
एकंदरीतच उत्तम अभिनय, अभ्यासपूर्ण कथा आणि उच्च तंत्राद्यानाच्या सहाय्याने मांडलेल्या अश्या पौराणिक कथा नक्कीच प्रेक्षेकांमध्ये लोकप्रिय होतात. गणपती बाप्पांची हि नव्या स्वरूपातील तेजोमय गाथा, इतर पौराणिक मालीकेंच्या तुलनेत हि नवी मालिका प्रेक्षेकांना किती पसंतीची पडते ते लवकरच कळेल.