वेदश्री खाडिलकरने साकारली निरागस ‘खारी’

येत्या शुक्रवारी , १ नोव्हेंबर रोजी  ‘खारी बिस्कीट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या चित्रपटात पाच वर्षांच्या गोंडस पण अंध मुलीची, ‘खारी’ची प्रमुख भूमिका साकारलीये  वेदश्री खाडिलकर हिने. चित्रपटाच्या प्रोमोला  प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाचे टायटल सॉंग अतिशय लोकप्रिय झाले आहे.

Vedashree Khadilkar, 'Khari Biscuit' Marathi
Vedashree Khadilkar, ‘Khari Biscuit’ Marathi

निरागस, अंध खारीचं कास्टिंग हा या चित्रपटाचा एक फार महत्वाचा भाग होता आणि आव्हानही होतं. सुमारे ३५० मुलींच्या ऑडिशन्सनंतर खारी म्हणजेच वेदश्री मिळाली. खारी हे कॅरेक्टर अंध असल्यामुळे तिला आर्टिफिशिअल लेन्स लावण्यात येणार होत्या. खारीचं वय ५ वर्षे असल्यामुळे शूटिंग दरम्यान पाठांतरसुद्धा महत्वाचे होते. चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी वेदश्री करून तीन महिन्याच्या ब्लाइंडनेस ट्रेनिंग वर्कशॉपमधून तयारी करून घेण्यात आली.

‘खारी बिस्कीट’चे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “वेदश्री शिवाय दुसरी खारी होणं शक्य नाही. खारी बिस्कीट ही फिल्म माझ्यासाठी फार स्पेशल आहे आणि त्यात खारीचं कास्टिंग अत्यंत महत्वाचं होतं.” चित्रपटास सर्व रसिक प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम आणि तिकीट बारीवर मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.