‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे आपल्या समोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.
Daisy Shah, Dance in dagadi chawl
‘ राघू पिंजऱ्यात आला (Raghu Pinjrat Ala )’ असे या गाण्याचे बोल असून डेझी शाह (Daisy Shah) या बॅालिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे हीचा आवाज लाभला आहे. तर अवघ्या बॉलीवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. गाण्याचे भन्नाट बोल, डेझीचा सीझलिंग परफॉर्मन्स आणि घायाळ करणाऱ्या तिच्या अदा या सगळ्यामुळे हे गाणे ग्लॅमरस बनले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ येत्या १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
MarathiMovieWorld aka MMW – The leading portal of Marathi cinema, Marathi film, Marathi Natak, Marathi Drama, Marathi Serials, Marathi Entertainment, Movies