Tag Archives: Nandu Honap

‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही संगीत ध्वनिफीत भक्तांसाठी प्रकाशित

श्री स्वामी समर्थांचा महिमा गीतमय सोहळ्यातून अनुभवण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा‘ या ध्वनिफीतीची निर्मिती करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थांची ही लीला आपणास साधी सोपी सरळ वाटेल वरवर ती तशी दिसेल पण त्यातील मथितार्थ गूढ अर्थ जाणला तर ती निश्चितच आपणा सर्वांस बोधप्रद ठरणारी अशीच असते. स्वामी समर्थांचा महिमा, त्यांचे कार्य, त्यांची कीर्ती भक्तिगीतांच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवीन संगीत ध्वनिफीत स्वामींच्या भक्तांसाठी उपलब्ध झाली असून या ध्वनिफीतीचा दिमाखदार प्रकाशन अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

Swami Trilokyacha Ajit Kadkade
Ajit Kadkade and Vaijayanti Parab, Swami Trailokyacha Album

स्वामी त्रैलोक्याचा‘ या ध्वनिफीतीची निर्मिती वैजयंती परब यांनी केली आहे. या ध्वनिफीतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी व्यक्त केले. वैजयंती परब लिखित ‘स्वामी त्रैलोक्याचा‘ या ध्वनिफीतीमधील गाण्यांना अनेक नामवंत गायकांनी स्वरसाज चढवला आहे. पद्मश्री अनुप जलोटा, पद्मश्री अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, रविंद्र साठे, वैशाली सामंत आणि आर्या आंबेकर या प्रसिद्ध गायकांचा यात समावेश आहे. संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी यातील गीते संगीतबद्ध केली आहेत. ‘माता पिता बंधू सखा’,’अंतरंग रंगले माझे’, ‘स्वामीमय झाले मन‘,’स्वामी के दरबार में‘, ‘तेरी क्रिपा होगी‘, ‘तुझे रूप चित्ती‘, ‘स्वामी पाके तेरे दरसन‘,’जय देव जय देव अक्कलकोट स्वामी‘ अशा हिंदी–मराठी गाण्यांचा नजराणा या ध्वनिफीतीत असणार आहे.