‘नेक्स्ट स्टेप’ या अनोख्या उपक्रमाअंतर्गत नवोदित कलाकारांना मार्गदर्शन
टेलिव्हिजन आणि सिनेमाक्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी, जयंत पवार यांनी ‘नेक्स्ट स्टेप’ हा अनोखा उपक्रम आयोजिला आहे. ह्या क्षेत्रात काम कराचे असेल तर फक्त अभिनय असणे गरजेचं नसून त्या बरोबर अनेक तांत्रिक बाबींचा सुद्धा अभ्यास असणे गरजेचा असतो. ह्या वेबिनार मध्ये, प्रत्यक्षात कॅमेऱ्या समोर उतरल्यावर नक्की काय करायचं? मोबाईल कॅमेरा आणि फिल्म कॅमेरा यात फरक असतो? या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल जाणत्या, अनुभवी दिग्गजांकडून जाणून घ्यायला मिळणार आहेत.
स्वरूप रिक्रिएशन्स अँड मीडिया प्रा.लि. ने आजवर अनेक मराठी चित्रपटांची, नाटकांची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. त्यांच्या द्वारे ३१ मे ते ६ जून या कालावधीत ‘नेक्स्ट स्टेप’ ह्या वेबमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबमिनार मध्ये अभिनेता प्रसाद ओक, कॅमेरामन वासुदेव राणे,दिग्दर्शक मंदार देवस्थळी, दिग्दर्शक गिरीश मोहिते, असे अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वेबमिनारच्या अधिक माहितीसाठी ९००४७८८५७२ या क्रमांकावर संपर्क साधावा