अभिनेत्री पायल कबरे झळकणार ‘तू गणराया’ या गाण्यात
गणरायाच्या आगमनाने सर्वत्र मंगलमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळतंय. ह्या काळात गणेशभक्तांच्या भेटीसाठी काही विशेष आणि नवीन मराठी गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आपल्याला पाहायला मिळते. अशाच एका ‘तू गणराया’ या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोकाच चुकविला आहे. .
‘तू गणराया…’ या गाण्यामधे एका नव विवाहित जोडप्याने गणरायाच्या आगमनाची तयारी कशी केली, शिवाय अतुट नात जपत, बायकोला प्रोत्साहन देत, आणि स्वतः पुढाकार घेऊन एका नवीन परंपरेचा श्री गणेशा या गाण्यातून सादर केला. अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे यांनी या गाण्यात अभिनय आणि नृत्याच्या जोरावर गाण्याची शोभा वाढविली. तर सचिन आंबात दिग्दर्शित असलेल्या या गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. गायिका स्नेहा महाडीक आणि गायक रोहित ननवरे यांनी आपल्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवण्यास दिली. रोहित ननवरे यांनी या गाण्याला संगीतबद्ध देखील केले आहे.