Tag Archives: prajakta Gaikwad

प्राजक्ता गायकवाडच्या ‘साजनी’ या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती

Prajakta Gaikwad actress
Prajakta Gaikwad actress
“स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज” या मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ने महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात तिच्या अभिनयाच्या जोरावर घर केले आहे. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि अजूनही प्रेक्षक या भूमिकेसाठी तिला दाद देताना दिसतात.आता प्राजक्ता प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेत येणार आहे. प्रेक्षकांसाठी प्राजक्ता ‘साजनी’ या गाण्यातून भेटीस येत आहे.

प्राजक्ता सोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसणार असून त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. “साजनी” हे त्यांच्या स्वप्नातील गाणं आहे. हे गाणं म्हणजे प्रत्येकाच्या मनामनातलं, स्वप्नातलं गाणं असल्याने प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच भावेल यांत शंकाच नाही. हे गाणे धैर्य आणि तेजस यांनी स्वरबद्ध केले असून याची संकल्पना निर्माते शिवाजी जवळे यांची आहे. या गाण्याला धीरज भालेराव यांनी दिग्दर्शित केले असून  याचे डिझायनिंग शलाका बोजवार यांनी केले आहे. तर सीमा दारवटकर यांनी मेकअप आर्टिस्टची भूमिका उत्तमरीत्या पेलवली. बाळा कांबळे यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.