‘प्लॅनेट मराठी’चे ‘प्लॅनेट गोयं (Planet Goem)’ ॲप गोवेकरांसाठी सज्ज
पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा बहुमान मिळवल्यानंतर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही तरी झक्कास घेऊन येत आहे. प्लॅनेट मराठी आता एक नवीन, मनोरंजनात्मक आणि माहितीपूर्ण असा ॲप घेऊन आले आहे. हा ॲप खास गोव्यासाठी बनवण्यात आला आहे. या सुपर ॲपचे नाव ‘प्लॅनेट गोयं’ असून यात मनोरंजनाबरोबरच व गोव्याची इत्यंभूत माहितीही उपलब्ध होणार आहे. नुकतीच या ॲपची घोषणा करण्यात आली असून गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते ‘प्लॅनेट गोयं’ चे अनावरण करण्यात आले.
‘प्लॅनेट गोयं’ केवळ मनोरंजनापुरताच मर्यादित नसून यामध्ये ट्रॅव्हल, टुरिझम, फूड, इव्हेंट्स या सगळ्याची माहिती उपलब्ध असणार आहे. हा अॅप गोव्यातील स्थानिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी निश्चितत फायद्याचा ठरेल. ‘प्लॅनेट गोयं’ हा पहिला कोंकणी अँप असून इंग्रजी, हिंदीतील आशयांबरोबरच कोंकणी भाषेतील मनोरंजनात्मक आशय आणि मराठी भाषेतील डब फिल्म्सही या ॲपवर उपलब्ध असतील.