Tag Archives: Pravin Kuwar

साऊथचा तडका असलेल धमाल गाणं ‘अण्णाने लावला चुन्ना’

Prasad Appa Tarkar, Kautuk Shirodkar, Pravin Kuvar, Bharati Madhavi, Mayuri Shubhanand
Prasad Appa Tarkar, Kautuk Shirodkar, Pravin Kuvar, Bharati Madhavi, Mayuri Shubhanand

पप्पी दे पारूला’ च्या अभुतपुर्व यशानंतर प्रसाद आप्पा तारकर दिग्दर्शित साउथ तडका असलेलं ‘अण्णाने लावला चुन्ना‘ या मराठी लोकगीताचे मेकिंग नुकतेच यू ट्यूबवर लॉन्च झाले. सुमित म्युझिक प्रस्तुत ‘अण्णाने लावला चुन्ना‘ या गाण्याला गीतकार कौतुक शिरोडकर यांनी शब्दबद्ध केले असून प्रवीण कुवर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या गाण्याला अस्सल तडका दिला आहे. मराठीला साऊथचा तडका दिल्यामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीत उतरले आहे. या गाण्यातून मयुरी शुभानंद ही अभिनेत्री झळकणार असून लवकर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्वांना नाचायला लावणारं आणि मराठीला मस्त असा साऊथचा तडका दिलेलं हे गाणं हा एक नवा प्रयोग होता. कोणतंही गाणं हे जेव्हा हिट होतं तेव्हा त्यामागे गायक आणि संगीतकार यांच्या सोबतच गीतकाराचा खूप मोठा सहभाग असतो. कारण जेव्हा गाण्याचे शब्द प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतात आणि त्यांना भावतात तेव्हाच ते गाणं हिट होतं. गीतकार संगीतकार व गायिका यांची मेहनत आणि कलाकारांचा अभिनय पाहता ‘अण्णाने लावला चुन्ना‘ हे गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल असा विश्वास होता आणि हा प्रेक्षकांनी सार्थ ठरवला. गेल्या दोन दिवसात दहा हजारांहून अधिक लोकांनी युट्युबवर हे गाणे पाहिलं आहे. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहता येत्या काळात हे गाणे अजूनच लोकप्रिय होईल यात शंका नाही.

‘माझी माय मुंब्रादेवी’ रसिकांच्या भेटीला

Pravin Kuwar Vaishali Samant
Singer Pravin Kuwar and Vaishali Samant

महाराष्ट्राला संगीत आणि संगीतप्रेमींची फार मोठी परंपरा आहे. इथला रसिकराजा जितक्या आनंदाने सिने-नाटय गीतं डोक्यावर घेतो तितक्याच भक्तीभावाने देवी-देवतांच्या भजनातही रमतो. आता भक्तीरसाने भरलेलं ‘माझी माय मुंब्रादेवी‘ हे गीत रसिकांच्या भेटीला येत आहे. श्री चंद्रछाया प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘माझी माय मुंब्रादेवी‘ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची महती वर्णन करण्यात आली आहे. ‘या कोळीवाडयाची शान…‘ फेम संगीतकार-गायक प्रविण कुंवर यांनी या गाण्याला संगीत दिलं असून समीर चंद्रकांत देसाई यांनी गीत लेखन केलं आहे. वैशाली सामंत आणि प्रविण कुंवर यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. राजेंद्र पवार आणि प्रवीणा समीर देसाई यांनी या गाण्याचे व्हिडीओ दिग्दर्शन केलं आहे.

माझी माय मुंब्रादेवी‘ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची कथा आणि महती ऐकायला मिळणार आहे. वैशाली सामंतच्या सुमधूर आवाजात मुंब्रादेवीचं गीत ऐकताना भक्तांंचा आनंद द्विगुणीत होईल याबाबत शंका नाही.मुंब्रादेवी हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. या गाण्यामुळे मुंब्रादेवीची महती सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल अशी भावना दिग्दर्शकांनी व्यक्त केली.