‘माझी माय मुंब्रादेवी’ रसिकांच्या भेटीला
महाराष्ट्राला संगीत आणि संगीतप्रेमींची फार मोठी परंपरा आहे. इथला रसिकराजा जितक्या आनंदाने सिने-नाटय गीतं डोक्यावर घेतो तितक्याच भक्तीभावाने देवी-देवतांच्या भजनातही रमतो. आता भक्तीरसाने भरलेलं ‘माझी माय मुंब्रादेवी‘ हे गीत रसिकांच्या भेटीला येत आहे. श्री चंद्रछाया प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘माझी माय मुंब्रादेवी‘ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची महती वर्णन करण्यात आली आहे. ‘या कोळीवाडयाची शान…‘ फेम संगीतकार-गायक प्रविण कुंवर यांनी या गाण्याला संगीत दिलं असून समीर चंद्रकांत देसाई यांनी गीत लेखन केलं आहे. वैशाली सामंत आणि प्रविण कुंवर यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. राजेंद्र पवार आणि प्रवीणा समीर देसाई यांनी या गाण्याचे व्हिडीओ दिग्दर्शन केलं आहे.
‘माझी माय मुंब्रादेवी‘ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची कथा आणि महती ऐकायला मिळणार आहे. वैशाली सामंतच्या सुमधूर आवाजात मुंब्रादेवीचं गीत ऐकताना भक्तांंचा आनंद द्विगुणीत होईल याबाबत शंका नाही.मुंब्रादेवी हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. या गाण्यामुळे मुंब्रादेवीची महती सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल अशी भावना दिग्दर्शकांनी व्यक्त केली.