प्रेमाचा प्रवास घडवणारा चित्रपट ‘प्रेमवारी’ फेब्रुवारीत प्रदर्शित

Marathi Film Premwaari
Bharat Ganeshpure Mayuri Kapadne, Chinmay Udgirkar & others, Marathi Film Premwaari

प्रेमवारी‘ या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. राहुल आणि पूजा यांची कॉलेज मध्ये होणारी भेट, त्यातून फुलत जाणारं प्रेम पण, याच प्रेमात काही गोष्टी अडसर ठरायला लागतात आणि काही कारणामुळे परिवाराकडून होणारा विरोध या सर्व अडथळ्यामुळे पुढे ह्या प्रेमाचा प्रवास कसा होतो ते आपल्याला चित्रपटातच पाहावे लागेल.
प्रेमवारी‘ या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय बऱ्याच दिवसांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मयुरी कापडणे च्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे. यांच्यासोबतच भारत गणेशपुरे, अभिजित चव्हाण, नम्रता पावसकर, राजेश नन्नावरे, निशा माने, प्रियांका उबाळे, विशाल खिरे हे कलाकार देखील चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘प्रेमवारी‘ हा सिनेमा ८ फेब्रुवारी ला रिलीज होणार आहे. या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असून वैशाली सामंत, श्रेया घोषाल, आदर्श शिंदे आणि सोनू निगम यांनी आपल्या मधुर आवाजाने गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.