‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत अभिमन्यू – लतिकाच्या नात्यात येणार कायमाचा दुरावा?
कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबसमोर आले. आणि हे सत्य लपवल्यामुळे अभि आणि लतिकाचे नातं पणाला लागलं. प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि – लतिकाबद्दल झाले आहे. दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. कारण अभिमन्युला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते आहे. एकीकडे अभिमन्यूने आईला दिलेले वचन की, मी लतिकाला घरी परत घेऊन येणार. तर दुसरीकडे, लतिकाने बापूंना दिलेला शब्द. लतिका बापूंच्या विरुध्द जाऊन अभिमन्यूला साथ देईल ? हे सगळंच प्रेक्षकांना हळूहळू मालिकेमधून कळणार आहे. अभिमन्यू – लतिका या संकटाला कसे सामोरे जातील ? कशी एकमेकांची साथ देतील ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर.
वटपौर्णिमेच्या दिवशी अभिमन्यू आणि लतिकाचे जुळू पाहणारं नातं पुन्हा दुरावलं. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्यादिवसापासून मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारतून तिला बाहेर काढलं. अभिमन्यूसमोर आता मोठा पेच उभा ठाकला आहे त्याला लतिकासोबतच बापू आणि संपूर्ण कुटुंबाची मनं जिंकायची आहे. मालिकेमध्ये पुढे काय घडेल ? जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस
कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये सध्या अभिमन्यू आणि लतिकाचे मालिकेध्ये वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात. ‘आपल्यात कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार‘ असे लतिकाने अभिला सांगितले आहे. अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला मिळणार आहे अभिची साथ.
प्रेक्षकांच्या मिळणार्या उदंड प्रतिसादामुळे मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले… मालिकेतील पात्र, अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अभीची आई म्हणजेच अतिशा नाईक, अभिची वाहिनी तसेच कामिनी, सज्जनराव यांची भूमिका देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सध्या मालिकेमध्ये शर्यतीचा मुद्दा सुरू आहे ज्यात दौलतने अभिमन्यूला भाग घेण्याचे आव्हान दिले आहे. पण, अभीचे वडील याच्या पुर्णपणे विरोधात आहेत. अभिमन्यू लतिकाच्या साथीने कसा वडिलांचा होकार मिळवणार ? आणि तो शर्यतीत भाग घेणार का ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.