Tag Archives: Soham Theatre

‘ मृणालताई करंडक २०२२’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

Mrunaltai Natyakarandak Ekankika Spardha
Mrunaltai Natyakarandak Ekankika Spardha
मराठी  एकांकिका विश्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या एकांकिका स्पर्धांपैकी एक अशी  ‘मृणालताई करंडक’ ही स्पर्धा अल्पावधीत एकांकिका कलाकारांची आवडती स्पर्धा ठरली आहे. पुढील महिन्यात ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली।
हौशी आणि होतकरू नाट्यकर्मींना या एकांकिका स्पर्धेद्वारे एक हक्काचं आणि आपलं व्यासपीठ दिले जात आहे. एकांकिकांच्या माध्यमातून अनेक कलाकार घडले आहेत आणि घडतही आहेत, याच प्रक्रियेत आपलाही हातभार असावा म्हणून सोहम थिएटरन ही२०१७ पासून या स्पर्धेला सुरुवात केली आहे. स्पर्धेला या २ वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृह बंद असल्यामुळे अर्धविराम लागला होता पण आता मोठ्या विश्रांतीनंतर नाट्यगृह पुन्हा सुरु होताच या स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरीच्या तारखा स्पर्धेचे आयोजक असेलल्या सोहम थिएटर्सचे सुदेश सावंत यांनी जाहीर केल्या आहेत.

Soham Theatre, Ekankika
Soham Theatre, Ekankika
यंदाच्या वर्षी स्पर्धेची प्राथमिक फेरी ही २० जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान केशव गोरे स्मारक येथे होणार असून स्पर्धेची अंतिम फेरी २४ जानेवारीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे पहिल्या दोन सत्रात होणार आहे. २०१९ला झालेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ६० स्पर्धक संस्थानी सहभाग घेतला होता. तर २ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर यंदा स्पर्धेला अजून चांगला प्रतिसाद मिळेल असे आयोजकाना वाटते. मृणाल ताई नाट्यकरंडक’ या एकांकिका स्पर्धेत प्रथम येणाऱ्या एकांकिकेला रोख रक्कम  ३१,०००/- आणि मानचिन्ह देऊन गौरविले जाईल. तसेच द्वितीय आणि लक्षवेधी एकांकिकांना अनुक्रमे २१,०००/- व ११,०००/- आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. त्याचबरोबर अनेक वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजक सुदेश सावंत – ९८२१३५५२६४ समन्वयक संतोष वाडेकर- ८७७९९०४१९३ गिरीश सावंत ९८६७४४४४९८ याना संपर्क करावा.