Tag Archives: Thech

‘ठेच’ मधून उलगडणार प्रेमत्रिकोण

Marathi Film 'Thech' Poster
Marathi Film ‘Thech’ Poster
श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि लक्ष्मण सोपान थिटे दिग्दर्शित ‘ठेच (Thech)’ या नवीन मराठी चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सईद मोईन सईद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली असून ५ जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाची कथा थोडक्यात म्हणजे , आई वडील नसलेला चित्रपटाचा मुख्य नायक, शिवा आपल्या मामाच्या घरी राहून आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्न रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबाला जवळ पल्लावीला प्रपोज करतो.पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटातून मांडला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण सोपान थिटे यांनीच चित्रपटाचं कथालेखन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक  यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.