Tag Archives: Yogesh Bhosale

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री सांगणारा ‘वन फोर थ्री’ ४ मार्चला सिनेमागृहात

अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले असताना, पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे स्वरूप बदलले आहे आणि त्यात ओमिक्रॉनमुळे पुन्हा नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत.

'143' Marathi movie, Sheetal Ahirrao
‘143’ Marathi movie, Sheetal Ahirrao

प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक मायबाप ही आमच काळीज आहे! होय! आणि या काळजाच्या काळजीपोटीच सध्याचा कोविड संसर्ग आणि निर्बंधांमुळे आपल्या सर्वांच्या काळजाजवळची मराठी प्रेमकथा ११  फेब्रुवारी ऐवजी पुढे नेत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट असून बॉलिवूडने देखील या चित्रपटाची दखल घेतली होती, इतकेच नव्हे तर करेन तर मामाचीच, हे आपलं काळीज हाय या टॅगलाईनसुद्धा प्रेक्षकांकडून सतत ऐकायला मिळत होत्या मात्र हा चित्रपट ११ फेब्रुवारी ऐवजी ४मार्चला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार हे या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपट प्रदर्शनात वितरकाचीही मुख्य भूमिका असते, या चित्रपटात अनिल थडाणी यांनी वितरकाची भूमिका अगदी योग्यरित्या निभावली आहे.

New Marathi film ‘Mangalashtak Return’ highlights Divorce ceremony

Shweta Kharat, Sheetal Ahirrao, Prajakta Newale, Saksham Kulkarni
Shweta Kharat, Sheetal Ahirrao, Prajakta Newale, Saksham Kulkarni

Recently, a video about a divorce ceremony being performed had become viral on social media. There was a big discussion going on among the viewers as to giving so much of importance to this kind of ceremony. But, it turned out to be a clipping of the shooting of forthcoming Marathi film ‘Mangalashtak Return’, which is in progress after there was relaxation on the long period of lockdown .

This film is being produced by  Veerkumar Shah under his banner Sharda Productions and is directed by Yogesh Bhosale who had earlier directed a Marathi film ‘Bazaar’ which had won 16 different awards. Shooting of this film is presently in progress at Hinjawadi, Pune and the film stars Prasad Oak, Anand Ingale, Saksham Kulkarni, Vrushabh Shah, Shweta Kharat, Prasanna Ketkar, Sheetal Ahirrao, Sunil Godbole, Kamlesh Sawant, Sameer Poulaste, Prajakta Nevale, Sonal Pawar, Bhakti Chavan and Sheetal Oswal