‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमात महाराष्ट्राला टॉप १० स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी त्यांच्यात आता सुरांची टक्कर होतांना बघायला मिळते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे आळंदीचा चैतन्य देवढे (Chaitanya Devadhe). ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ हे तंतोतंत लागू पडणारा चैतन्य आयडलच्या मंचावर ‘माउली’ म्हणून लोकप्रिय आहे. इंडियन आयडल हा मंच स्वप्नपूर्तीचा आहे. चैतन्यला आता पार्श्वगायक होण्याची संधी मिळणार आहे.
Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi
गोड गळ्याचा चैतन्य ऑडिशन राउंडपासून परीक्षकांची मनं जिंकतो आहे. त्याच्या खेळकर स्वभावाने त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धकांनाही अल्पावधीतच आपलेसे केले. तिथून ते टॉप १० पर्यंत चैतन्यने गाण्याच्या आणि आवाजाच्या साथीने परीक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. माउलींचा आशीर्वाद, घरून अर्थातच बाबांकडून लाभलेला सांगीतिक वारसा आणि मेहनत या सगळयांच्या साथीने ‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्यासाठी चैतन्य जिद्दीने रियाज करतोय.
MarathiMovieWorld aka MMW – The leading portal of Marathi cinema, Marathi film, Marathi Natak, Marathi Drama, Marathi Serials, Marathi Entertainment, Movies