जगाची सावली, माझी स्वामीराज माऊली- ‘जय जय स्वामी समर्थ’ कलर्स मराठीवर!

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ किंवा ‘अशक्यही शक्य करतील स्वामी” हा अमृतमय संदेश देणाऱ्या असाधारण सिध्दपुरुषाचे, ‘श्री स्वामी समर्थां’चे जीवनचरित्र जय जय स्वामी समर्थ‘ या कलर्स मराठीवरील नवीन मराठी मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Jay Jay Swami Samarth, Marathi Serial
Jay Jay Swami Samarth, Marathi Serial

 आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहेपरमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल ३०० वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडं तोडणार्‍या एका इसमाच्या हातून कुर्‍हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली. तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. इथून खर्‍या अर्थाने प्रवास सुरू झाला.  श्री स्वामी समर्थ यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांचे अनुयायी आज संपूर्ण भारतभर नाही तर जगभर पसरलेले आहेत. हिमालयभारत – चीन सीमाकाशीत्रिविक्रम सरोवर असे भ्रमण करून ते अक्कलकोट येथे स्थिरावले. स्वामी समर्थ यांचं शेकडो वर्षांचं वास्तव्यसुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे.

 

 अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीतत्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले. कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेलीअक्कलकोट येथील चोळप्पाशीसेवेकरी सुंदराबाईअक्कलकोटचे राजे मालोजीरावया भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील ‘ जय जय स्वामी समर्थ’ ह्या मालिकेतून ,  २८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या. ९.३० वा. कलर्स मराठीवर  प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.