महाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला!

सोनी मराठी वरील मजेदार आणि दर्जेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Sai Tamahankar, Maharashtrachi hasya Jatra on Sony Marathi
Sai Tamahankar, Maharashtrachi hasya Jatra on Sony Marathi

आणि अशा या सगळ्यांच्या लाडक्या हास्यकत्रेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत. ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे की गेली २.५ वर्ष संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सगळ्यांना खळखळून हसवते आहे.हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जात आणि हे हसवणं गेले चार सीजन सातत्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या प्रेक्षकांना देत आहे. नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज महाराष्ट्राची हास्यजत्रा.

सुप्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमनी.मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ३०० नाबादच्या या सोहळ्याला हजर होते. अनेक वर्षांनी एवढं हसलो अशी प्रतिक्रिया या वेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले.

हा विनोदाचा विशेष सोहळा येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला रात्री ९ वा. प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.