सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ सध्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची चर्चा होताना दिसते. ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. पाटलांच्या घरात कोणीतरी सुरुंग स्फोट घडवण्याचं कारस्थान करतं, पण आर्या मात्र ते कारस्थान हाणून पाडते आणि आर्या काहीतरी करणार असल्याचा अंदाज विराटला येतो. तो आणि पाटील कुटुंब तिच्यावर नजर ठेवू लागतं आणि आर्या घराबाहेर कशी पडणार हा प्रश्न निर्माण होतो. आर्या (वीणा जगताप) आता विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडणार का, हे येत्या रविवारी, ७ फेब्रुवारी, संध्या. ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या महाएपिसोड मधे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
Read MoreNews & Updates
हसणं अनलॉक करण्यासाठी येत आहे कॉमेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस्
गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निमालं. ‘कोरोना’ नामक वादळाने गेलं वर्षभर जगाला हादरवून सोडलं . पण आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय. अतरंगी कलाकारांची सतरंगी धमाल घेऊन कलर्स मराठी दर्जेदार आणि निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे, एका धम्माल विनोदी शो सह. […]
Read More‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेने गाठला १०० भांगाचा पल्ला
कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन मालिका सुरू होण्याआधी बरीच चर्चेत होती. मालिकेचा विषय खूपच वेगळा, सुयश – सायलीची जोडी देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस होणार होती, सुकन्या कुलकर्णी मोने या देखील कलर्स मराठीवर परतणार होत्या. सुबोध आणि मंजिरी भावे यांची निर्माते म्हणून पहिलीच मालिका आणि बर्याच गोष्टी. सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व […]
Read Moreस्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त वृक्षारोपण
सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. Neen Kulkarni, Dr Amol Kolhe, Sayaji Shinde, while tree plantation on set 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती. त्या निमित्ताने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आले. स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या टीमने 150 रोपटी लावली. या कार्यक्रमाला डॉ. अमोल कोल्हे, नीना कुळकर्णी आणि सयाजी शिंदे हे उपस्थित होते. शिवजयंती निमित्ताने शिरूर येथे बायोडायव्हर्सिटी प्लांटची उभारणी करणार असल्याचे डॉ. कोल्हेनी या वेळी सांगितलं. शिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशाल, या वृक्षारोपणाचा विचार घेऊन या वेळी शिवनेरीवर देखील जाऊ असंही ते म्हणाले.जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त मी सगळ्यांना हे आव्हान करतो की झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या तरच लोक त्यांना जपतील.
Read Moreसमीर चौघुले दिसणार गंडावरे बाबांच्या भूमिकेत!
समीर चौघुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत सगळ्यांना माहीत आहे. समीर आपल्या विनोदी अभिनयानं आणि कमाल टाइमिंगनं सगळ्यांचा लाडका झाला आहे. समीर आता प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत दिसणार आहे आणि ती भूमिका आहे गंडावरे बाबांची. सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेतल्या उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचंआगमन होणार आहे. मालिकेतली सखीची आई अनसूया ही गंडावरे बाबांची भक्त आहे. तिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असतो आणि आता या गंडावरे बाबांचं मालिकेत आगमन होणार आहे. हे गंडावरे बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सर्वांचा लाडका समीर चौघुले! गंडावरे बाबा हे विनोदी पात्र असून याच्या मालिकेत 14 जानेवारीला आगमन होणार आहे, गंडावरे बाबांच्या येण्यानी मालिकेमध्ये आणि उपासनेंच्या घरी काय धमाल होते, ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘अस्सं महेर नको गं बाई’, सोम.-शनि., रात्री 10 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
Read More‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस
कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये सध्या अभिमन्यू आणि लतिकाचे मालिकेध्ये वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात. ‘आपल्यात कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार‘ असे लतिकाने अभिला सांगितले आहे. अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला मिळणार […]
Read More‘चंद्र आहे साक्षीला’ मधे जुळणार स्वाती आणि श्रीधरची रेशीमगाठ
कलर्स मराठीवर ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेमध्ये श्रीधरच्या तोतया बायकोला भेटल्यावर देखील स्वाती श्रीधरचं खरं रूप ओळखू शकत नाही. स्वाती उघड्या डोळ्याने देखील सत्य बघू शकत नाहीये कारण,तिच्या डोळ्यावर श्रीधरच्या प्रेमाची पट्टी आहे. स्वातीसमोर स्वतःला प्रामाणिक म्हणून सिद्ध करण्यासाठी श्रीधरने अनेक नवनवे डाव रचले. आणि त्यात स्वाती पूर्णत: अडकत चालली आहे. श्रीधर आणि स्वातीच्या जुळू […]
Read Moreजगाची सावली, माझी स्वामीराज माऊली- ‘जय जय स्वामी समर्थ’ कलर्स मराठीवर!
‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ किंवा ‘अशक्यही शक्य करतील स्वामी” हा अमृतमय संदेश देणाऱ्या असाधारण सिध्दपुरुषाचे, ‘श्री स्वामी समर्थां’चे जीवनचरित्र ‘जय जय स्वामी समर्थ‘ या कलर्स मराठीवरील नवीन मराठी मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह […]
Read MoreHero No. 1 Govinda to appear on ‘Maharashtra’s Best dancer’ Platform
The TV reality show ‘Maharashtra’s Best Dancer’ has popularised in a short time among the home viewers. In this show, talented dancers from different parts of Maharashtra are making their presence felt. To encourage these participants and their Gurus, the presenters of this show have invited Hero No. 1 Govinda as a special guests in […]
Read More