News

श्री. श्री. रविशंकर यांच्या शुभहस्ते ‘अ.ब.क’ चित्रपटातील स्फुर्ती गीताचे लोकार्पण

ABC Marathi Movie Song Launch by Shri Shri Ravi Shankar, Kiran Bedi

‘ABC’ Marathi Movie Song Launch by Shri Shri Ravi Shankar, Kiran Bedi

आगामी मराठी चित्रपट ‘अ.ब.क’ च्या स्फुर्ती गीताचा सोहळा संपन्न नुकताच ‘आर्ट ऑफ लिविंग’चे सर्वेसर्वा गुरुदेव श्री. श्री. रविशंकर यांच्या शुभहस्ते त्यांच्या आश्रमातील प्रचंड जनसमुदायाच्या समवेत पार पडला. या सोहळ्यास पॉन्डिचेरीच्या राज्यपाल मा. किरण बेदी व मा. अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित होत्या.

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ. ब. क’  या चित्रपटाद्वारे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देण्यात आला आहे . यावेळी चित्रपटातील नायक लायन फेम सनी पवार, साहिल जोशी, आर्या घारे, दीपाली बोरकर या कलावंतास निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी, दिग्दर्शक – रामकुमार गोरखनाथ शेडगे, लेखक – आबा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

अश्विनी शेंडे शामराज दत्ता लिहलेल्या गीतांना संगीतकार बापी – टूटूल ह्यांनी संगीतबद्ध केले असून त्यासाठी अमृता देवेंद्र फडणवीस ह्यांनी पार्श्वगायन केले आहे . लवकरच हा चित्रपट प्रेक्षांच्या भेटीस येणार आहे .

Most Popular

To Top
  • News Alert Subscription
  •