अभिनेत्री अदिती द्रविडची चाहत्यांना नवीन भेट

अभिनेत्री अदिती द्रविडने ‘राधा‘ या गाण्याची आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल‘ आणि ‘मी राधिका‘ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय.

Actress Aditi Dravid Photo
Actress Aditi Dravid

राधा‘ गाण्याविषयी सांगताना अदिती द्रविड म्हणते, “उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात अखंड बुडालेल्या राधाला रंगवताना भरतनाट्यम डान्सर असल्याचा फायदा मला झाला. मी शास्त्रीय नृत्यांगना असल्याने मला ह्या कथा, त्यातले भाव आणि पदन्यास माहित होते. आणि त्यामूळेच राधा गाण्यात मी ते भाव उत्तमपध्दतीने साकारू शकले.”

टायनी टॉकिज प्रस्तूत पियुष कुलकर्णी दिग्दर्शित हे मॅशअप सुवर्णा राठोडने गायले आहे, तर हे गाणे अभिनेत्री आदिती द्रविडवर चित्रीत झाले आहे.