प्रीतम कागणे दिसणार ‘लॉकडाऊन लग्न’ मध्ये

Ramesh Pardeshi, Pritam Kagne, Lockdown lagna movie
Ramesh Pardeshi, Pritam Kagne, Lockdown lagna movie

अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi), अभिनेत्री प्रीतम कागणे (Pri tam  Kagne) भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली असून, लॉकडाऊन लग्न हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे,. चित्रपटातून कोरोना काळातल्या लग्नाची गोष्ट दाखवली जाणार आहे. उत्तम स्टारकास्टसह धमाल, मजेशीर आणि मनोरंजक असं कथानक या चित्रपटाची खासियत आहे.

Pritam Kagne aactress in Marathi Film 'Lockdown Lagna'
Pritam Kagne aactress in Marathi Film ‘Lockdown Lagna’

रमेश परदेशी आणि प्रीतम कांगणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून त्यांच्या सक्षम अभिमनयाचं दर्शन घडवलं आहे. “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटात ते पहिल्यांदा़च भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.  या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, क्षितिष दाते, अमोल कागणे, विराट मडके,प्राजक्ता गायकवाड,अश्विनी चावरे, चेतन चावडा, किरण कुमावत, सुशांत दिवेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

Ramesh Pardeshi in Marathi film 'Lockdown Lagna'
Ramesh Pardeshi in Marathi film ‘Lockdown Lagna’