अभिनेत्री शिवानी सोनार झळकणार वेबसिरीज मध्ये

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या अभिनयाचे कौतुक होत असून, हि मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे आपल्याला दिसतं . छोटया पडद्यवरून आता शिवानी हि डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. कॅफेमराठी प्रस्तुत आणि बाप फिल्म्स, रिझॉन्स स्टुडिओ निर्मित ‘वन बाय टू’ हि मराठी
वेबसिरीज मध्ये एक वेगळ्या अशा भूमिकेत शिवानी सोनार दिसतीये.
.
कोणत्याही रिलेशनशिप मध्ये दोन्ही बाजू जर लॉयल असतील तर ते रिलेशन खूप चांगलं टिकतं असं म्हणतात. पण जर त्याच लॉयलटीची माँ कि आँख झाली तर? काय-काय मजा मस्ती आणि घडामोडी घडतात, हेच या सिरीजमध्ये बघायला मिळेल. या वेब सिरीजचे लेखन निशांत गजभे आणि रोहित निकम यांनी केले असून दिग्दर्शक निशांत गजभे आहे. या वेब सिरीजमध्ये रोहित निकम, शिवानी सोनार, अनामिका डांगरे, श्रेयस गुजार, आदित्य हविले, आरोही वकील, रवींद्र बंदगार आणि अभय महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘वन बाय टू’ हि मराठी वेबसिरीज नुकतीच एमक्स प्लेअर, एअरटेल एक्सट्रिम आणि व्हीआय मूव्हीज म्हणजेच वोडाफोन प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झाली आहे.