‘अल्बम काढाल काय’ गाण्यात अमृता खानविलकरचा हॉट आणि ग्लॅमर्स लूक

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर,विकास पवार, स्मिता ओमळे निर्मित ‘चोरीचा मामला’ या चित्रपटातलं   ‘अल्बम काढाल काय’ हे  गाणं नुकतच  सोशल मीडियावर  प्रदर्शित करण्यात आले.  ज्यामध्ये आपल्याला अमृता खानविलकर अतिशय ग्लॅमरस आणि हॉट लुकमध्ये ठुमके लावताना दिसते.

Amruta Khanvilkar Dance
Amruta Khanvilkar Dance

तरुणाईमध्ये प्रसिद्द असलेली  मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडेनं “अल्बम काढाल काय” हे गाणं गायलं आहे. जितेंद्र जोशीनं लिहिलेलं हे गाणं संगीतकार चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला सोशल मीडियात चांगली लोकप्रियता मिळत असल्याचे पाहायला मिळतेय.

जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या  ‘चोरीचा मामला’ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन  प्रियदर्शन जाधवनं ह्याने केले असून येत्या  ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.