अंकुश चौधरी आणि प्राजक्तानी घातलाय ‘चायनीज गोंधळ’

Ankush  Chaudhari, Prajakta Mali, Luckdown
Ankush Chaudhari, Prajakta Mali, Luckdown

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी  ह्यांच्या मुख्य भमिका असलेल्या आगामी ‘लकडाऊन (Luckdown)’ या चित्रपटांतील ‘च्यावम्याव’  हे पहिल गाण नुकतच प्रदर्शित करण्यात आल. चीनच्या एका चुकीमुळे संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागले आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांना संदेश देणारा असा हा पहिला ‘इंटरनॅशनल गोंधळ’ आहे. आदर्श शिंदे,  विश्वजित जोशी आणि मैथिली पानसे जोशी या गायकाच्या सुरांनी हा गोंधळ सजला असून रविंद्र मठाधिकारी याने शब्दात उतरवला असून त्याला अविनाश विश्वजित या जोडीने संगीतबद्ध केलंय.

 लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले तर अशाच एका लग्नाची गोष्ट ‘लकडाऊन’ सांगत आहे. लॉकडाऊनच्या मध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे. तर या च्यावम्याव या गोंधळाने प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली कुणकुण मजेशीर रित्या शब्दात आणि सुरात एकत्र बांधली गेली आहे.

Prajakta mali
Prajakta mali