कॅप्टन दिलीप दोंदे आणि जितेंद्र जोशी खेळणार ज्ञानाचा खेळ – ‘कोण होणार करोडपती’

Captain Dilip Donde, Jitendra Joshi, Sachin Khedekar
Captain Dilip Donde, Jitendra Joshi, Sachin Khedekar

कोण होणार करोडपती’मध्ये गेल्या कर्मवीर विशेष भागात पद्मश्री नाना पाटेकर हॉटसीटवर आले होते. त्यांनी एकूण २५ लाख एवढी रक्कम जिंकून रंगकलामंच कलाकारांना दिली. या आठवड्यात २४ जुलैच्या कर्मवीर विशेष भागात ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे आणि त्यांच्याबरोबर  अभिनेता जितेंद्र जोशीयेणार आहेत. कॅप्टन दोंदे हे रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत आणि ते पहिले भारतीय आहेत ज्यांनी समुद्रातून  विश्वभ्रमंती केली आहे. त्यांच्या सागर परिक्रमा या प्रकल्पांतर्गत स्वतः बोट बनवून त्यांनी एकट्याने ही सफर केली आहे.

Marathi Kon Honaar Crorepati on sony marathi

Marathi Kon Honaar Crorepati on sony marathi

हॉटसीटवर कॅप्टन दोंदे यांनी आपल्या सागर परिक्रमेचे अनेक रोमांचक किस्से सांगितले. जितेंद्रनेही आपली एक कविता या वेळी वाचून दाखवली! गप्पा, कविता, ज्ञान आणि समाजाला आपण काहीतरी देण्याची जाण, या सगळ्यांमुळे हा कर्मवीर विशेष भाग फार छान जमून आला आहे.

घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती – प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधी.

पाहा, ‘कोण होणार करोडपती – कर्मवीर विशेष’ २४ जुलै, शनिवार, रात्री ९ वा.